S M L

पाण्यासाठी काळविटाला गमवावा लागला जीव

03 मेराज्यातील दुष्काळाचा फटका माणसांबरोबर प्राण्यांनाही बसतोय. पाण्याच्या शोधार्थ गावाजवळील तलावाकडे आलेल्या काळवीटाला आपला प्राण गमवावा लागला आहे. काळवीट आमगाव जवळच्या तलावात पाणी प्यायला जात असताना गावातील शिकारी कुत्र्यांनी या काळविटाचा चावा घेवून त्याला ठार केलं. जंगलात वनविभागाने प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन दिले नाहीत. त्यामुळे प्राण्यांना मानवी वस्तीकडे जावं लागतंय. गोंदिया वनविभागाने या जंगलात हौद केवळ कागदोपत्रीच बांधल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2012 10:41 AM IST

पाण्यासाठी काळविटाला गमवावा लागला जीव

03 मे

राज्यातील दुष्काळाचा फटका माणसांबरोबर प्राण्यांनाही बसतोय. पाण्याच्या शोधार्थ गावाजवळील तलावाकडे आलेल्या काळवीटाला आपला प्राण गमवावा लागला आहे. काळवीट आमगाव जवळच्या तलावात पाणी प्यायला जात असताना गावातील शिकारी कुत्र्यांनी या काळविटाचा चावा घेवून त्याला ठार केलं. जंगलात वनविभागाने प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन दिले नाहीत. त्यामुळे प्राण्यांना मानवी वस्तीकडे जावं लागतंय. गोंदिया वनविभागाने या जंगलात हौद केवळ कागदोपत्रीच बांधल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2012 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close