S M L

पाण्यासाठी महिलांचे हंडा आंदोलन

04 मेकोकणातही आता पाणी टंचाई तीव्र होत चालली आहे. लांजा तालुक्यातल्या चिंचुर्डी गावातल्या महिलांनी पाण्यासाठी पंचायत समितीसमोर हंडे घेऊन धरणं आंदोलन केलं. गेले आठ दिवस या गावात पाण्याचा टँकरच गेलेला नाही . 40 कुटुंब आणि 200 पाळीव जनावरं असलेल्या या वस्तीला पाण्याचा एका हंड्यासाठी रोज 10 किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. सरकारच्या जीआर नुसार एका कुटुंबाला फक्त 40 लीटर पाणी मिळतंय. पण हे पाणीही सध्या या कुटुंबांना मिळेनासं झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2012 09:50 AM IST

पाण्यासाठी महिलांचे हंडा आंदोलन

04 मे

कोकणातही आता पाणी टंचाई तीव्र होत चालली आहे. लांजा तालुक्यातल्या चिंचुर्डी गावातल्या महिलांनी पाण्यासाठी पंचायत समितीसमोर हंडे घेऊन धरणं आंदोलन केलं. गेले आठ दिवस या गावात पाण्याचा टँकरच गेलेला नाही . 40 कुटुंब आणि 200 पाळीव जनावरं असलेल्या या वस्तीला पाण्याचा एका हंड्यासाठी रोज 10 किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. सरकारच्या जीआर नुसार एका कुटुंबाला फक्त 40 लीटर पाणी मिळतंय. पण हे पाणीही सध्या या कुटुंबांना मिळेनासं झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close