S M L

सचिनचा बंगला पुन्हा वादात

05 मेमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुंबईतील वांद्रे येथील बंगला पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सचिनने बंगल्याची ओसीन घेता प्रवेश केला म्हणून त्याला 4 लाख 35 हजारांचा दंड ठोठवण्यात आला होता. पण सचिनने खरचं हा दंड भरला का ? अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागितलेली असता ती दयायला मुंबई महापालिकेने नकार दिला आहे. सचिननेच ही माहिती देऊ नका असं पालिकेनं म्हटलं आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (वांद्रे) पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवर चार मजली अलिशान बंगला बांधला या बंगल्यात सप्टेंबर महिन्यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयाने गृहप्रवेश केला. पण सचिनने महानगरपालिकेकडून ओसी (ऑक्युपेशन सर्टीफिकेट) घेतले नसल्यामुळे तब्बल 4 लाख 35 हजारांचा दंड ठोठवण्यात आला. क्रिकेटच्या देवाला दंड ठोठवल्यामुळे मुंबईतील अनेक राजकारण्यांनी पालिकेकडे दंड माफी करावी अशी मागणी केली पण महापालिकेने मागणी धुडकावून लावत सचिन हा सर्वसामान्य मुंबईकरांसारखाच आहे त्यांला दंड भरावाच लागेल असं जाहीर केलं. सचिनने 4 लाख 35 हजारांचा दंड भरला. पण अलीकडेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात, सचिनला दिलेल्या भोगवटा प्रमाणपत्र आणि आकारणी केलेल्या दंडाच्या रकमेची माहिती महापालिकेला मागितली होती. पण पालिका प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला आहे. याबद्दल सचिन तेंडुलकरनं अशी माहिती देण्यास मज्जाव केल्याचा महापालिकेचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2012 09:22 AM IST

सचिनचा बंगला पुन्हा वादात

05 मे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुंबईतील वांद्रे येथील बंगला पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सचिनने बंगल्याची ओसीन घेता प्रवेश केला म्हणून त्याला 4 लाख 35 हजारांचा दंड ठोठवण्यात आला होता. पण सचिनने खरचं हा दंड भरला का ? अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागितलेली असता ती दयायला मुंबई महापालिकेने नकार दिला आहे. सचिननेच ही माहिती देऊ नका असं पालिकेनं म्हटलं आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (वांद्रे) पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवर चार मजली अलिशान बंगला बांधला या बंगल्यात सप्टेंबर महिन्यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयाने गृहप्रवेश केला. पण सचिनने महानगरपालिकेकडून ओसी (ऑक्युपेशन सर्टीफिकेट) घेतले नसल्यामुळे तब्बल 4 लाख 35 हजारांचा दंड ठोठवण्यात आला. क्रिकेटच्या देवाला दंड ठोठवल्यामुळे मुंबईतील अनेक राजकारण्यांनी पालिकेकडे दंड माफी करावी अशी मागणी केली पण महापालिकेने मागणी धुडकावून लावत सचिन हा सर्वसामान्य मुंबईकरांसारखाच आहे त्यांला दंड भरावाच लागेल असं जाहीर केलं. सचिनने 4 लाख 35 हजारांचा दंड भरला. पण अलीकडेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात, सचिनला दिलेल्या भोगवटा प्रमाणपत्र आणि आकारणी केलेल्या दंडाच्या रकमेची माहिती महापालिकेला मागितली होती. पण पालिका प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला आहे. याबद्दल सचिन तेंडुलकरनं अशी माहिती देण्यास मज्जाव केल्याचा महापालिकेचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2012 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close