S M L

शिवसेनेचे आमदार देणार सुवर्णगणेश मूर्ती !

04 मेदिवेआगार गणेश मूर्ती प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. आता शिवसेनेचे आमदार या मंदिरात गणेशाची सुवर्णमूर्ती द्यायला तयार झाले आहे. पण दिवेआगरच्या गावकर्‍यांनी आणि मंदिर समितीने यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साकडं घालावं असंही या आमदारांचं म्हणणं आहे. या मूर्तीवरुन सुरु असलेलं राजकारण हे योग्य नसल्याचं सेनेच्या 13 आमदारांचं मत आहे. याच प्रकरणावरुन या आमदारांना अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलं होतं. मूर्ती चांदीची की सोन्याची या मुद्यावरुन राजकारण सुरू असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पुण्यातील सराफ जितेंद्र घोडके यांच्या चांदीच्या मूर्तीला गावकर्‍यांनी जोरदार विरोध केला. या मूर्ती प्रकरणावरुन दिवेआगरची ग्रामसभाही गावकर्‍यांनी काल उधळली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2012 12:30 PM IST

शिवसेनेचे आमदार देणार सुवर्णगणेश मूर्ती !

04 मे

दिवेआगार गणेश मूर्ती प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. आता शिवसेनेचे आमदार या मंदिरात गणेशाची सुवर्णमूर्ती द्यायला तयार झाले आहे. पण दिवेआगरच्या गावकर्‍यांनी आणि मंदिर समितीने यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साकडं घालावं असंही या आमदारांचं म्हणणं आहे. या मूर्तीवरुन सुरु असलेलं राजकारण हे योग्य नसल्याचं सेनेच्या 13 आमदारांचं मत आहे. याच प्रकरणावरुन या आमदारांना अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलं होतं. मूर्ती चांदीची की सोन्याची या मुद्यावरुन राजकारण सुरू असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पुण्यातील सराफ जितेंद्र घोडके यांच्या चांदीच्या मूर्तीला गावकर्‍यांनी जोरदार विरोध केला. या मूर्ती प्रकरणावरुन दिवेआगरची ग्रामसभाही गावकर्‍यांनी काल उधळली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2012 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close