S M L

पुणे विद्यापीठात प्रेमी युगुलाकडून सुरक्षारक्षकाची हत्या

04 मे'शिक्षणाचं माहेर घरं' असलेल्या पुणे शहरात विद्यापीठ परिसरात खळबळजनक घटना घडली. पुणे विद्यापीठात काल रात्री एक अज्ञात प्रेमी युगलाकडून सुरक्षा रक्षक प्रल्हाद जोगदनकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुणे विद्यापीठ परिसरात गुरुवारी रात्री प्रल्हाद जोगतनकर आणि बाबा निकाळजे हे दोन सुरक्षारक्षक गस्त घालत होते. तेव्हा त्यांना विद्यापीठाच्या परिसरातल्या झुडपात 2 प्रेमी युगलं अश्लील चाळे करताना दिसली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना 500 रुपये दंड आकारला. तरुणांनी ते दिले. त्यानंतर एक जोडपं तिथून निघून गेलं. दुसर्‍या जोडप्याने पेट्रोलसाठी 100 रुपये परत मागितले. पण पैसे द्यायला नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने जोगतनकरवर पिस्तुलातून 2 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.काहीशे एकरवर पसरलेल्या या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अनेक दिवसांपासून होतेय. या घटनेमुळे विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र यावर विद्यापीठातल्या कोणत्याही अधिकार्‍याने बोलायला नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2012 11:15 AM IST

पुणे विद्यापीठात प्रेमी युगुलाकडून सुरक्षारक्षकाची हत्या

04 मे

'शिक्षणाचं माहेर घरं' असलेल्या पुणे शहरात विद्यापीठ परिसरात खळबळजनक घटना घडली. पुणे विद्यापीठात काल रात्री एक अज्ञात प्रेमी युगलाकडून सुरक्षा रक्षक प्रल्हाद जोगदनकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

पुणे विद्यापीठ परिसरात गुरुवारी रात्री प्रल्हाद जोगतनकर आणि बाबा निकाळजे हे दोन सुरक्षारक्षक गस्त घालत होते. तेव्हा त्यांना विद्यापीठाच्या परिसरातल्या झुडपात 2 प्रेमी युगलं अश्लील चाळे करताना दिसली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना 500 रुपये दंड आकारला. तरुणांनी ते दिले. त्यानंतर एक जोडपं तिथून निघून गेलं. दुसर्‍या जोडप्याने पेट्रोलसाठी 100 रुपये परत मागितले. पण पैसे द्यायला नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने जोगतनकरवर पिस्तुलातून 2 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

काहीशे एकरवर पसरलेल्या या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अनेक दिवसांपासून होतेय. या घटनेमुळे विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र यावर विद्यापीठातल्या कोणत्याही अधिकार्‍याने बोलायला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2012 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close