S M L

सिंचनावरुन बाबा-दादांमध्ये जुंपली

05 मेराज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारी पातळीवरुन 110 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे पण इतकी दिवस खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या सत्ताधार्‍यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. मुख्यमंत्र्यांनी केल्या आरोपाला उपमुख्यमंत्र्यांनी धादंड खोटे आहे असा आरोप केला आहे. जलसिंचन प्रकल्पांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो पण तरीही दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. पाणी मुरण्याऐवजी कोट्यवधी रुपयेच मुरतायत. यावर आता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच प्रश्न उपस्थित केला. गेल्या 10 वर्षात राज्याच्या जलसंपदा विभागाने काय दिवे लावले याचा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच असा पाढा वाचला. साहजिकच 10 वर्षांपासून जलसंपदा खात सांभाळणार्‍या राष्ट्रवादीच्या हे चांगलंच जिव्हारी लागलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिखट प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्याच काहीही तथ्य नाही असा खुलासा अजितदादांनी केला.सिंचनासाठी खर्च झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच जुंपली आहे. यावर शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी टीका केली. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी आधी शेतात उतरावे आणि शेतकर्‍यांसाठी काही करावे मग काय श्वेतपत्रिका काढायची असेल तर खुशाला काढा असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.आधी दुष्काळाच्या जबाबदारीवरून काँग्रेस राष्ट्रवादीत रंगलेलं राजकारण. आणि आता सिंचनासाठी मुरलेल्या 20 हजार कोटी रुपयांच्या मुद्द्यावरून होणारे आरोप- प्रत्यारोप यात दुष्काळाशी दोन हात करणार्‍या जनतेचे प्रश्न मात्र दुर्लक्षित होत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2012 05:26 PM IST

सिंचनावरुन बाबा-दादांमध्ये जुंपली

05 मे

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारी पातळीवरुन 110 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे पण इतकी दिवस खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या सत्ताधार्‍यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. मुख्यमंत्र्यांनी केल्या आरोपाला उपमुख्यमंत्र्यांनी धादंड खोटे आहे असा आरोप केला आहे.

जलसिंचन प्रकल्पांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो पण तरीही दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. पाणी मुरण्याऐवजी कोट्यवधी रुपयेच मुरतायत. यावर आता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच प्रश्न उपस्थित केला. गेल्या 10 वर्षात राज्याच्या जलसंपदा विभागाने काय दिवे लावले याचा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच असा पाढा वाचला. साहजिकच 10 वर्षांपासून जलसंपदा खात सांभाळणार्‍या राष्ट्रवादीच्या हे चांगलंच जिव्हारी लागलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिखट प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्याच काहीही तथ्य नाही असा खुलासा अजितदादांनी केला.

सिंचनासाठी खर्च झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच जुंपली आहे. यावर शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी टीका केली. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी आधी शेतात उतरावे आणि शेतकर्‍यांसाठी काही करावे मग काय श्वेतपत्रिका काढायची असेल तर खुशाला काढा असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.

आधी दुष्काळाच्या जबाबदारीवरून काँग्रेस राष्ट्रवादीत रंगलेलं राजकारण. आणि आता सिंचनासाठी मुरलेल्या 20 हजार कोटी रुपयांच्या मुद्द्यावरून होणारे आरोप- प्रत्यारोप यात दुष्काळाशी दोन हात करणार्‍या जनतेचे प्रश्न मात्र दुर्लक्षित होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2012 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close