S M L

आघाडीत रंगलं वस्त्रहरण

05 मेआज महाराष्ट्रात दुष्काळामुळे जनता होरपळून निघत आहे आणि विधिमंडळात 'महाराष्ट्र काल आज उद्या' या परिसंवादात बोलताना सत्ताधार्‍यांनी एकमेकांचं वस्त्रहरण केलंय. राज्यातल्या समस्या सोडवण्याऐवजी त्या कशा प्रलंबित राहिल्या यावरच एकमेकांवर चिखलफेक केली.काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांना टार्गेट केलं. तर आज अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. राज्याला सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या मुंबईकडं राज्य सरकारनं कमालीचं दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केला. तसेच केंद्रात आघाडी सरकार असताना एकमेकांनी मांडलेले प्रश्न सुटत असतील, तर राज्यात आघाडीचा मुद्दा त्यावर राजकारण करण्यात काय अर्थ आहे असा टोलाही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांनी लगावला. याआधी बोलताना विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अहवालातल्या माहितीचा आधार काय ? त्यातली माहिती किती अचूक असते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.या अगोदर जलसिंचन प्रकल्पांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो पण तरीही दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. पाणी मुरण्याऐवजी कोट्यवधी रुपयेच मुरतायत. यावर आता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच प्रश्न उपस्थित केला. गेल्या 10 वर्षात राज्याच्या जलसंपदा विभागाने काय दिवे लावले याचा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच असा पाढा वाचला. साहजिकच 10 वर्षांपासून जलसंपदा खात सांभाळणार्‍या राष्ट्रवादीच्या हे चांगलंच जिव्हारी लागलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिखट प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्याच काहीही तथ्य नाही असा खुलासा अजितदादांनी केला.मात्र मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, 'आर्थिक पाहणी अहवालावरूनच मी सिंचनाची माहिती दिली. हा अहवाल अजित पवारांनीच प्रकाशित केलाय. '2001 मध्ये सिंचन क्षमता होती 17.08%, तर 2011 मध्ये 17.09%, मग यावर काय बोलणार?'' - पृथ्वीराज चव्हाण आयबीएन लोकमतचे काही सवाल सत्ताधार्‍यांमधल्या या राजकारणावर..- सत्ताधारी जनतेची दिशाभूल करताहेत का ?- उणिवांची कबुली देऊन हात झटकण्याचा प्रयत्न होतोय का ?- आर्थिक पाहणी अहवाल चुकीचा असेल, तर योजना दिशाहीन ठरताहेत का ?- सत्ताधार्‍यांमधल्या राजकारणामुळं गंभीर प्रश्न बाजूला पडताहेत का ?

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2012 01:47 PM IST

आघाडीत रंगलं वस्त्रहरण

05 मे

आज महाराष्ट्रात दुष्काळामुळे जनता होरपळून निघत आहे आणि विधिमंडळात 'महाराष्ट्र काल आज उद्या' या परिसंवादात बोलताना सत्ताधार्‍यांनी एकमेकांचं वस्त्रहरण केलंय. राज्यातल्या समस्या सोडवण्याऐवजी त्या कशा प्रलंबित राहिल्या यावरच एकमेकांवर चिखलफेक केली.

काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांना टार्गेट केलं. तर आज अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. राज्याला सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या मुंबईकडं राज्य सरकारनं कमालीचं दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केला. तसेच केंद्रात आघाडी सरकार असताना एकमेकांनी मांडलेले प्रश्न सुटत असतील, तर राज्यात आघाडीचा मुद्दा त्यावर राजकारण करण्यात काय अर्थ आहे असा टोलाही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांनी लगावला. याआधी बोलताना विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अहवालातल्या माहितीचा आधार काय ? त्यातली माहिती किती अचूक असते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.

या अगोदर जलसिंचन प्रकल्पांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो पण तरीही दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. पाणी मुरण्याऐवजी कोट्यवधी रुपयेच मुरतायत. यावर आता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच प्रश्न उपस्थित केला. गेल्या 10 वर्षात राज्याच्या जलसंपदा विभागाने काय दिवे लावले याचा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच असा पाढा वाचला. साहजिकच 10 वर्षांपासून जलसंपदा खात सांभाळणार्‍या राष्ट्रवादीच्या हे चांगलंच जिव्हारी लागलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिखट प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्याच काहीही तथ्य नाही असा खुलासा अजितदादांनी केला.

मात्र मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, 'आर्थिक पाहणी अहवालावरूनच मी सिंचनाची माहिती दिली. हा अहवाल अजित पवारांनीच प्रकाशित केलाय. '2001 मध्ये सिंचन क्षमता होती 17.08%, तर 2011 मध्ये 17.09%, मग यावर काय बोलणार?'' - पृथ्वीराज चव्हाण आयबीएन लोकमतचे काही सवाल सत्ताधार्‍यांमधल्या या राजकारणावर..- सत्ताधारी जनतेची दिशाभूल करताहेत का ?- उणिवांची कबुली देऊन हात झटकण्याचा प्रयत्न होतोय का ?- आर्थिक पाहणी अहवाल चुकीचा असेल, तर योजना दिशाहीन ठरताहेत का ?- सत्ताधार्‍यांमधल्या राजकारणामुळं गंभीर प्रश्न बाजूला पडताहेत का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2012 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close