S M L

हंडाभर पाण्यासाठी नदीत खड्डेच खड्डे

05 मेभिवंडी तालुक्यात पाण्याचा एक हंडा मिळवण्यासाठी नदीत खड्डे खोदले जात आहे. या खड्‌ड्यातलं पाणी जनावरांनी पिऊ नये यासाठी काटेरी कुंपण घातलं जातंय. खड्‌ड्यात पाणी साठण्यासाठी तासंतास वाट पहावी लागतेय. नदीतलं पाणी आटल्यानं फक्त माणसंच नाही तर जनावरंही पाण्यावाचून तडफडत आहे. ही जनावरं पाणी शोधत माणसांनी खोदलेल्या खड्डयांजवळ घुटमळतायत. मात्र तहानलेल्या जनावरांना पाणी मिळू नये फक्त माणसांना पाणी मिळावे यासाठी खड्‌ड्यांभोवती काटेरी कुंपण घातली गेलीत. हे चित्र पाहिल्यास जनावरांना चारा आणि पाणी देण्याच्या सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्याच्या दिसत आहे. तर दुसरीकडे जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राबवलेल्या भिवंडी तालुक्यातल्या 72 गावांची पाणीपुरवठा योजना धूळ खात पडली आहे. लाखो रूपये खर्चून 1992 साली संबंधित गावांमध्ये पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र 6 ते 7 महिन्यांनंतर हा पाणीपुरवठा बंद झाला तो आतापर्यंत. या वापरात नसल्याने टाक्या आणि पाईपलाईन सडलीय. वॉल्ववर गंज पकडला आहे. तर काही चोरट्यांनी यातले मधले पाईप चोरून नेण्याचीही करामत करून दाखवली आहे. गावोगावी दिसणा-या टाक्या वर्षानुवर्षे रिकाम्याच आहेत. या योजनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2012 04:56 PM IST

हंडाभर पाण्यासाठी नदीत खड्डेच खड्डे

05 मे

भिवंडी तालुक्यात पाण्याचा एक हंडा मिळवण्यासाठी नदीत खड्डे खोदले जात आहे. या खड्‌ड्यातलं पाणी जनावरांनी पिऊ नये यासाठी काटेरी कुंपण घातलं जातंय. खड्‌ड्यात पाणी साठण्यासाठी तासंतास वाट पहावी लागतेय. नदीतलं पाणी आटल्यानं फक्त माणसंच नाही तर जनावरंही पाण्यावाचून तडफडत आहे. ही जनावरं पाणी शोधत माणसांनी खोदलेल्या खड्डयांजवळ घुटमळतायत. मात्र तहानलेल्या जनावरांना पाणी मिळू नये फक्त माणसांना पाणी मिळावे यासाठी खड्‌ड्यांभोवती काटेरी कुंपण घातली गेलीत. हे चित्र पाहिल्यास जनावरांना चारा आणि पाणी देण्याच्या सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्याच्या दिसत आहे.

तर दुसरीकडे जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राबवलेल्या भिवंडी तालुक्यातल्या 72 गावांची पाणीपुरवठा योजना धूळ खात पडली आहे. लाखो रूपये खर्चून 1992 साली संबंधित गावांमध्ये पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र 6 ते 7 महिन्यांनंतर हा पाणीपुरवठा बंद झाला तो आतापर्यंत. या वापरात नसल्याने टाक्या आणि पाईपलाईन सडलीय. वॉल्ववर गंज पकडला आहे. तर काही चोरट्यांनी यातले मधले पाईप चोरून नेण्याचीही करामत करून दाखवली आहे. गावोगावी दिसणा-या टाक्या वर्षानुवर्षे रिकाम्याच आहेत. या योजनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2012 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close