S M L

कालवा असून गावं कोरडी !

रवि शिंदे, भिवंडी07 मेठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुकाही सध्या उन्हानं तळपतोय. पाण्याची समस्या इथेही गंभीर आहे. विरोधाभास म्हणजे इथून मुंबईची तहान भागवली जाते. पण इथला रहिवासी असलेला गरीब शेतकरी वर्षानुवर्ष तहानलेला आहे. 25 वर्षांपूर्वी बांधलेल्या भातसा कालव्यात पाणी सोडलं, तर 50 गावांच्या सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटू शकते.भिवंडी तालुक्यातल्या 100 गावांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी भातसा कालवा बांधण्यात आला. 54 किलोमीटरच्या या कालव्यासाठी 25 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट आहे. भातसा कालव्यातून 10 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सैतानी नदीत पाणी सोडण्यात आलं. पण दुसर्‍या बाजूला अजून पाणी मिळत नाही. कालवा बांधताना काही ठिकाणी वनजमिनीचा वाद पुढे आला. त्यामुळे 40 ते 50 गावांना पाणी पुरवठा करण्यात अडथळे आलेत. इथून मुंबईला पाणी पुरवठा होतो. पण स्थानिक तहानलेलेच आहे. या कालव्यात पाणी सोडलं तर हजारो लोकांची तहान भागू शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 11:32 AM IST

रवि शिंदे, भिवंडी

07 मे

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुकाही सध्या उन्हानं तळपतोय. पाण्याची समस्या इथेही गंभीर आहे. विरोधाभास म्हणजे इथून मुंबईची तहान भागवली जाते. पण इथला रहिवासी असलेला गरीब शेतकरी वर्षानुवर्ष तहानलेला आहे. 25 वर्षांपूर्वी बांधलेल्या भातसा कालव्यात पाणी सोडलं, तर 50 गावांच्या सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटू शकते.

भिवंडी तालुक्यातल्या 100 गावांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी भातसा कालवा बांधण्यात आला. 54 किलोमीटरच्या या कालव्यासाठी 25 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट आहे.

भातसा कालव्यातून 10 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सैतानी नदीत पाणी सोडण्यात आलं. पण दुसर्‍या बाजूला अजून पाणी मिळत नाही. कालवा बांधताना काही ठिकाणी वनजमिनीचा वाद पुढे आला. त्यामुळे 40 ते 50 गावांना पाणी पुरवठा करण्यात अडथळे आलेत. इथून मुंबईला पाणी पुरवठा होतो. पण स्थानिक तहानलेलेच आहे. या कालव्यात पाणी सोडलं तर हजारो लोकांची तहान भागू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close