S M L

पाणी नाही, पानं पुसली !

08 मे हंडाभर पाण्यासाठी आज दुष्काळग्रस्तांना चार-चार किलोमीटर पायपीट करावी लागतं आहे. दुष्काळभागात पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले पण दुष्काळग्रस्तांसारखीच मुख्यमंत्र्यांचीही अवस्था झाली. अवघ्या 10 मिनिटात पंतप्रधानासोबत बैठक पार पडली. पंतप्रधानांनी कोणतेच ठोस आश्वसन दिले नाही. मात्र एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. पण त्यांच्या बैठकी कधी होणार ? त्या बैठकीत काय ठरणार हे अजून दूरच राहिले आहे. त्यामुळे पाण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हाती 'रिकामा हंडा' पाण्याविना कोरडाच राहिला आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्याना आज दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागतोय. पिण्यासाठी पाणी तर दुरच जनावरांना चाराही उपलब्ध नाही. 11 जिल्ह्यांसाठी 110 कोटींची घोषणा केल्यानंतर आणखी मदतीसाठी दिल्ली दरबरी हजेरी लावली. पण दुष्काळाने त्रस्त राज्याला केंद्राकडून तातडीची मदत मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. दुष्काळावरच्या महत्त्वाच्या प्रश्नावरची ही भेट अवघ्या दहा मिनिटांत आटोपण्यात आली. राज्याच्या शिष्टमंडळाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही. राज्याला दुष्काळी निधी किती प्रमाणात द्यायचा हे ठरवण्यासाठी पंतप्रधानांनी एक समिती नेमली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि जलसंधारण मंत्री पवनकुमार बन्सल यांचा या समितीत समावेश आहे. त्यांच्या बैठकीनंतरच निधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण या बैठकीची तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या राज्यातल्या जनतेला केंद्राकडून आताच कोणतीही मदत मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या दुष्काळावर उपाय म्हणून केंद्राकडे 2200 कोटी रुपयांची मागणी करणार असं सांगितलं होतं पण निधी तर दूरच 'रिकामा हंडा' पाण्याने भरून तरी द्यावा अशी आशा दुष्काळग्रस्तांना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 05:42 PM IST

पाणी नाही, पानं पुसली !

08 मे

हंडाभर पाण्यासाठी आज दुष्काळग्रस्तांना चार-चार किलोमीटर पायपीट करावी लागतं आहे. दुष्काळभागात पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले पण दुष्काळग्रस्तांसारखीच मुख्यमंत्र्यांचीही अवस्था झाली. अवघ्या 10 मिनिटात पंतप्रधानासोबत बैठक पार पडली. पंतप्रधानांनी कोणतेच ठोस आश्वसन दिले नाही. मात्र एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. पण त्यांच्या बैठकी कधी होणार ? त्या बैठकीत काय ठरणार हे अजून दूरच राहिले आहे. त्यामुळे पाण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हाती 'रिकामा हंडा' पाण्याविना कोरडाच राहिला आहे.

महाराष्ट्रातील 11 जिल्ह्याना आज दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागतोय. पिण्यासाठी पाणी तर दुरच जनावरांना चाराही उपलब्ध नाही. 11 जिल्ह्यांसाठी 110 कोटींची घोषणा केल्यानंतर आणखी मदतीसाठी दिल्ली दरबरी हजेरी लावली. पण दुष्काळाने त्रस्त राज्याला केंद्राकडून तातडीची मदत मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. दुष्काळावरच्या महत्त्वाच्या प्रश्नावरची ही भेट अवघ्या दहा मिनिटांत आटोपण्यात आली. राज्याच्या शिष्टमंडळाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही. राज्याला दुष्काळी निधी किती प्रमाणात द्यायचा हे ठरवण्यासाठी पंतप्रधानांनी एक समिती नेमली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि जलसंधारण मंत्री पवनकुमार बन्सल यांचा या समितीत समावेश आहे. त्यांच्या बैठकीनंतरच निधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण या बैठकीची तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या राज्यातल्या जनतेला केंद्राकडून आताच कोणतीही मदत मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या दुष्काळावर उपाय म्हणून केंद्राकडे 2200 कोटी रुपयांची मागणी करणार असं सांगितलं होतं पण निधी तर दूरच 'रिकामा हंडा' पाण्याने भरून तरी द्यावा अशी आशा दुष्काळग्रस्तांना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close