S M L

पाणीटंचाईचा राज्यात दुसरा बळी

09 मेपाणीटंचाईमुळे ठाणे जिल्ह्यातल्या मोखाड्यामध्ये एका महिलेचा बळी गेल्यानंतर आता आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका आदिवासी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातल्या वळवाडी गावातली ही घटना आहे. रखूबाई सोनवणे ही आदिवासी महिला विहिरीच्या कडेवर उभी राहून पाणी भरत असताना तोल गेल्यामुळे विहिरीत पडली. या विहिरीत अगदी थोडं पाणी होतं. दगडावर डोकं आदळल्यानं तिचा मृत्यू झाला. ज्या विहिरीत रोज पाणी भरण्यासाठी रखूबाई जात होत्या त्याच विहिरीत पडून मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करतायच. या गावाने गेल्या अनेक दिवसांपासून टँकरची मागणी केली. पण अजून टँकर मिळालेला नाही. मोखाडा तालुक्यातल्या डोलार्‍याच्या पार्वती जाधव यांचा पाण्यासाठी अगोदर मृत्यू झाला होता. शिवाय या गावात एकच विहीर आहे. त्यामुळे विहिरीवर नेहमीच मोठी गर्दी असते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2012 10:08 AM IST

पाणीटंचाईचा राज्यात दुसरा बळी

09 मे

पाणीटंचाईमुळे ठाणे जिल्ह्यातल्या मोखाड्यामध्ये एका महिलेचा बळी गेल्यानंतर आता आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका आदिवासी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातल्या वळवाडी गावातली ही घटना आहे. रखूबाई सोनवणे ही आदिवासी महिला विहिरीच्या कडेवर उभी राहून पाणी भरत असताना तोल गेल्यामुळे विहिरीत पडली. या विहिरीत अगदी थोडं पाणी होतं. दगडावर डोकं आदळल्यानं तिचा मृत्यू झाला. ज्या विहिरीत रोज पाणी भरण्यासाठी रखूबाई जात होत्या त्याच विहिरीत पडून मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करतायच. या गावाने गेल्या अनेक दिवसांपासून टँकरची मागणी केली. पण अजून टँकर मिळालेला नाही. मोखाडा तालुक्यातल्या डोलार्‍याच्या पार्वती जाधव यांचा पाण्यासाठी अगोदर मृत्यू झाला होता. शिवाय या गावात एकच विहीर आहे. त्यामुळे विहिरीवर नेहमीच मोठी गर्दी असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2012 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close