S M L

अखेर HIVग्रस्त एसटी ड्रायव्हरला कामावर बोलावले

प्राची कुलकर्णी, पुणे08 मेअखेर पुण्यातील एचआयव्ही (HIV)ग्रस्त एसटी ड्रायव्हर सुरेशला वरिष्ठांकडून होणार्‍या त्रासाची दखल घेत एसटी महामंडळाने सुरेशला तात्काळ कामावर परत घेण्याचं आश्वासन दिलं आहे. आता त्याला कमी कष्टाचे काम दिले जाणार आहे.सुरेशच्या घरी आज अनेक दिवसांनी आनंदाचं वातावरण आहे. ते HIV पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर.. कदाचित पहिल्यांदाच त्यांना कोणती आनंदाची बातमी कळली आहे. सुरेशना आता एस.टी (S.T.) महामंडळाची नोकरी परत मिळाली आहे. त्यांना कमी मेहनतीचं काम आणि पगारही लवकरच मिळणार आहे. तसं आश्वासनच खुद्द परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिलं आहे.HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे सुरेशना मेहनतीचं काम करणं शक्य नव्हतं. पण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी वरिष्ठांनी त्यांना गेल्या चार महिन्यांपासून ना काम दिलं ना पगार. आयबीएन लोकमतने सोमवारी ही बातमी दाखवल्यानंतर मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलच शिवाय, मनसेच्या ST कामगार सेनेनंही पुण्यातल्या ST अधिकार्‍यांची भेट घेतली. आज एका सुरेशला न्याय मिळालाय. पण असे अनेक सुरेश आजही तुमच्या आमच्या सहकार्याची अपेक्षा करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 02:21 PM IST

अखेर HIVग्रस्त एसटी ड्रायव्हरला कामावर बोलावले

प्राची कुलकर्णी, पुणे

08 मे

अखेर पुण्यातील एचआयव्ही (HIV)ग्रस्त एसटी ड्रायव्हर सुरेशला वरिष्ठांकडून होणार्‍या त्रासाची दखल घेत एसटी महामंडळाने सुरेशला तात्काळ कामावर परत घेण्याचं आश्वासन दिलं आहे. आता त्याला कमी कष्टाचे काम दिले जाणार आहे.

सुरेशच्या घरी आज अनेक दिवसांनी आनंदाचं वातावरण आहे. ते HIV पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर.. कदाचित पहिल्यांदाच त्यांना कोणती आनंदाची बातमी कळली आहे. सुरेशना आता एस.टी (S.T.) महामंडळाची नोकरी परत मिळाली आहे. त्यांना कमी मेहनतीचं काम आणि पगारही लवकरच मिळणार आहे. तसं आश्वासनच खुद्द परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिलं आहे.

HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे सुरेशना मेहनतीचं काम करणं शक्य नव्हतं. पण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी वरिष्ठांनी त्यांना गेल्या चार महिन्यांपासून ना काम दिलं ना पगार. आयबीएन लोकमतने सोमवारी ही बातमी दाखवल्यानंतर मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलच शिवाय, मनसेच्या ST कामगार सेनेनंही पुण्यातल्या ST अधिकार्‍यांची भेट घेतली. आज एका सुरेशला न्याय मिळालाय. पण असे अनेक सुरेश आजही तुमच्या आमच्या सहकार्याची अपेक्षा करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close