S M L

माझ्या शाळेसाठी..!

संतोष दळवी, खालापूर07 मेरायगड जिल्ह्यातील खालापूरच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेनं 50 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना घडवणार्‍या या शाळेला मात्र अपुर्‍या सोईसुविधा, गळकी छतं, मोडकळीस आलेल्या भिंती अशी अवस्था झाली. आपल्या शाळेची अवस्था पाहुन माजी विद्यार्थी अस्वस्थ झाले. शाळेला जीवनदान देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी अडीच लाखांचा निधी गोळा केला. खालापूरची स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, या शाळेनं अनेक नामवंत विद्यार्थी घडवलेत. अनेकाचे जिवन घडवणार्‍या या शाळेची इमारतीची मात्र दुरावस्था झाली आहे. गळकी छतं, तूटलेल्या खिडक्या, मोडकळीस आलेल्या भिंती.. एवढचं काय पण विद्यार्थ्यांना बसायला साधे बाकही नाही.ही शाळा सावरलाय अखेर माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. माजी विद्यार्थ्यांनी बैठक घेतली आणि निधी जमवायला सुरुवात झाली. निधी गोळा झाला.यातून शाळेसाठी नवे बेंच आलेत, सुसज्ज रंगमच बांधण्यात आला. शाळेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला झाला. या सोहळ्यातून शाळेसाठी तब्बल अडीच लाखाचा निधी गोळा झाला. या निधीतून शाळेला नवं रुप देण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी घेतलेला पुढाकार पाहुन शिक्षक भारावून गेले. कालची ही पोरं किती मोठी झाली असे अभिमानास्पद उद्गार काढत कौतुकाने आपल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी पाठ थोपटली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 02:33 PM IST

माझ्या शाळेसाठी..!

संतोष दळवी, खालापूर

07 मे

रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेनं 50 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना घडवणार्‍या या शाळेला मात्र अपुर्‍या सोईसुविधा, गळकी छतं, मोडकळीस आलेल्या भिंती अशी अवस्था झाली. आपल्या शाळेची अवस्था पाहुन माजी विद्यार्थी अस्वस्थ झाले. शाळेला जीवनदान देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी अडीच लाखांचा निधी गोळा केला.

खालापूरची स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, या शाळेनं अनेक नामवंत विद्यार्थी घडवलेत. अनेकाचे जिवन घडवणार्‍या या शाळेची इमारतीची मात्र दुरावस्था झाली आहे. गळकी छतं, तूटलेल्या खिडक्या, मोडकळीस आलेल्या भिंती.. एवढचं काय पण विद्यार्थ्यांना बसायला साधे बाकही नाही.

ही शाळा सावरलाय अखेर माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. माजी विद्यार्थ्यांनी बैठक घेतली आणि निधी जमवायला सुरुवात झाली. निधी गोळा झाला.यातून शाळेसाठी नवे बेंच आलेत, सुसज्ज रंगमच बांधण्यात आला. शाळेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला झाला. या सोहळ्यातून शाळेसाठी तब्बल अडीच लाखाचा निधी गोळा झाला. या निधीतून शाळेला नवं रुप देण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी घेतलेला पुढाकार पाहुन शिक्षक भारावून गेले. कालची ही पोरं किती मोठी झाली असे अभिमानास्पद उद्गार काढत कौतुकाने आपल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी पाठ थोपटली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close