S M L

'अजिंठा'चा प्रिमिअर सोहळा रद्द

09 मेनितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित अजिंठा सिनेमाचा प्रिमिअर सोहळा रद्द करण्यात आला आहे. बहुचर्चित 'अजिंठा' हा सिनेमा येत्या 11 तारखेला रिलीज होणार आहे. त्यानिमित्तानं मुंबईत आज शानदार प्रिमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला बॉलीवूडमधीलही अनेक बड्या स्टार्सची उपस्थिती असणार होती, पण सिनेमाच्या टीमकडून समजलेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक कारणामुळे हा प्रिमिअर सोहळा रद्द करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच बंजारा समाजाने या सिनेमाविरोधात एक याचिका दाखल केली होती. अजिंठा सिनेमातील पारो ही बंजारा समाजाची असून सिनेमात ती आदिवासी समाजाची दाखवल्याने बंजारा समाजाने या सिनेमावर आक्षेप घेतला होता आणि म्हणूनच अजिंठा सिनेमाचा प्रिमिअर सोहळा रद्द झाला आहे अशी चर्चा इंडस्ट्रीत होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2012 03:38 PM IST

'अजिंठा'चा प्रिमिअर सोहळा रद्द

09 मे

नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित अजिंठा सिनेमाचा प्रिमिअर सोहळा रद्द करण्यात आला आहे. बहुचर्चित 'अजिंठा' हा सिनेमा येत्या 11 तारखेला रिलीज होणार आहे. त्यानिमित्तानं मुंबईत आज शानदार प्रिमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला बॉलीवूडमधीलही अनेक बड्या स्टार्सची उपस्थिती असणार होती, पण सिनेमाच्या टीमकडून समजलेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक कारणामुळे हा प्रिमिअर सोहळा रद्द करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच बंजारा समाजाने या सिनेमाविरोधात एक याचिका दाखल केली होती. अजिंठा सिनेमातील पारो ही बंजारा समाजाची असून सिनेमात ती आदिवासी समाजाची दाखवल्याने बंजारा समाजाने या सिनेमावर आक्षेप घेतला होता आणि म्हणूनच अजिंठा सिनेमाचा प्रिमिअर सोहळा रद्द झाला आहे अशी चर्चा इंडस्ट्रीत होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2012 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close