S M L

दोषी शाळांवर कारवाईला कोर्टाची स्थगिती

10 मेराज्यभरात जिल्हा शाळांमध्ये पट-पडताळणी मोहिमेत सरकारच्या हाती लागलेल्या दोषी शाळांवर फौजदारी कारवाईला सुरुवात होताच स्थगिती मिळाली आहे. यामध्ये दोषी असलेल्या शाळांवर कारवाई करण्याच्या सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने 22 जूनपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहेत. सरकारच्या निर्णयाना आव्हान देणा-या याचिका मराठवाडयातील संस्थाचालकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. राज्यामध्ये पडपडताळणी केल्यानंतर शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थी संख्येचं गौडबंगाल समोर आलं होतं. राज्यामध्ये 1 लाख 887 शाळांमध्ये 2 कोटी 3 लाख 638 विद्यार्थी शिकत असल्याची नोदं होती. मात्र पडपडताळणीनंतर वास्तव समोर आले. वास्तवात ज्यावेळी पटपडताणी केली त्यावेळी 1 कोटी 82 लाख 99 हजार 118 विदयार्थी उपस्थित होते. तर 20 लाख 70 हजार 520 इतके विदयार्थी गैरहजर होते. त्यामुळं संस्थाचालकाचे बिंग उघडे पडले होते. राज्यातील 50 टक्क्याहून कमी विद्यार्थी गैरहजर असलेल्या शाळांची संख्या आहे 2 हजार 659 इतकी. हे समोर आल्यानंतर राज्यसरकारनी दोषी असलेल्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. आता कोर्टाने 22 जूनपर्यंत कोर्टाने स्थगिती देण्यात आली आहे.पटपडताळणी आधी शाळा - 1 लाख 887 विद्यार्थी - 2 कोटी 3 लाख 638 पटपडताळणीनंतरउपस्थित - 1 कोटी 82 लाख 99 हजार 118 अनुपस्थित - 20 लाख 70 हजार 520 50 टक्क्याहून कमी उपस्थिती 2 हजार 659 शाळा

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2012 12:36 PM IST

दोषी शाळांवर कारवाईला कोर्टाची स्थगिती

10 मे

राज्यभरात जिल्हा शाळांमध्ये पट-पडताळणी मोहिमेत सरकारच्या हाती लागलेल्या दोषी शाळांवर फौजदारी कारवाईला सुरुवात होताच स्थगिती मिळाली आहे. यामध्ये दोषी असलेल्या शाळांवर कारवाई करण्याच्या सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने 22 जूनपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहेत. सरकारच्या निर्णयाना आव्हान देणा-या याचिका मराठवाडयातील संस्थाचालकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. राज्यामध्ये पडपडताळणी केल्यानंतर शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थी संख्येचं गौडबंगाल समोर आलं होतं.

राज्यामध्ये 1 लाख 887 शाळांमध्ये 2 कोटी 3 लाख 638 विद्यार्थी शिकत असल्याची नोदं होती. मात्र पडपडताळणीनंतर वास्तव समोर आले. वास्तवात ज्यावेळी पटपडताणी केली त्यावेळी 1 कोटी 82 लाख 99 हजार 118 विदयार्थी उपस्थित होते. तर 20 लाख 70 हजार 520 इतके विदयार्थी गैरहजर होते. त्यामुळं संस्थाचालकाचे बिंग उघडे पडले होते. राज्यातील 50 टक्क्याहून कमी विद्यार्थी गैरहजर असलेल्या शाळांची संख्या आहे 2 हजार 659 इतकी. हे समोर आल्यानंतर राज्यसरकारनी दोषी असलेल्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. आता कोर्टाने 22 जूनपर्यंत कोर्टाने स्थगिती देण्यात आली आहे.

पटपडताळणी आधी शाळा - 1 लाख 887 विद्यार्थी - 2 कोटी 3 लाख 638

पटपडताळणीनंतरउपस्थित - 1 कोटी 82 लाख 99 हजार 118 अनुपस्थित - 20 लाख 70 हजार 520

50 टक्क्याहून कमी उपस्थिती 2 हजार 659 शाळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2012 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close