S M L

'लोकपाल' याच अधिवेशनात ?

10 मेसंसदेच्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये लोकपाल विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अधिवेशन 30 मेपर्यंत सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. प्रलंबित विधेयकांसाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. यात लोकपाल विधेयकाचाही समावेश आहे. लोकायुक्तांचा मुद्दा वगळून उर्वरीत लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं कळतंय. दरम्यान, टीम अण्णाने लोकायुक्तची तरत्तूद लोकपाल विधेयकातच असावी अशी मागणी केलेली आहे. पण काही राजकीय पक्षांच्या भूमिकेचा विचार करुन सरकारला असा निर्णय घ्यावा लागेल असं केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2012 09:15 AM IST

'लोकपाल' याच अधिवेशनात ?

10 मे

संसदेच्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये लोकपाल विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अधिवेशन 30 मेपर्यंत सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. प्रलंबित विधेयकांसाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. यात लोकपाल विधेयकाचाही समावेश आहे. लोकायुक्तांचा मुद्दा वगळून उर्वरीत लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं कळतंय. दरम्यान, टीम अण्णाने लोकायुक्तची तरत्तूद लोकपाल विधेयकातच असावी अशी मागणी केलेली आहे. पण काही राजकीय पक्षांच्या भूमिकेचा विचार करुन सरकारला असा निर्णय घ्यावा लागेल असं केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2012 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close