S M L

गोंदियात नक्षलवाद्यांकडून सरपंचाची हत्या

10 मेगोंदियामध्ये नक्षलवाद्यांनी एका सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली आहे. तीन दिवसापुर्वी सशस्त्र नक्षलवाद्यांनी या सरपंच घनश्याम बुधाजी कोरेटी यांची ईस्तारी गावातून अपहरण केलं होतं. आज सकाळी धमधीटोला मिस्त्री या गावाजवळ कोरेटी यांचा मृतदेह सापडला. कोरेटी यांच्या मृतदेहाशेजारी नक्षलवाद्यांचं एक पत्रही मिळालं. या पत्रात कोरेटी हा पोलिसांचा खबर्‍या होता त्यामुळे आमच्या जनलढाईला धोका निर्माण झाला होता. अशा लोकांना अशीच शिक्षा मिळणार अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली. विशेष म्हणजे कोरेटी यांच्यावर शासकीय ग्राम आरोग्य पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2012 10:20 AM IST

गोंदियात नक्षलवाद्यांकडून सरपंचाची हत्या

10 मे

गोंदियामध्ये नक्षलवाद्यांनी एका सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली आहे. तीन दिवसापुर्वी सशस्त्र नक्षलवाद्यांनी या सरपंच घनश्याम बुधाजी कोरेटी यांची ईस्तारी गावातून अपहरण केलं होतं. आज सकाळी धमधीटोला मिस्त्री या गावाजवळ कोरेटी यांचा मृतदेह सापडला. कोरेटी यांच्या मृतदेहाशेजारी नक्षलवाद्यांचं एक पत्रही मिळालं. या पत्रात कोरेटी हा पोलिसांचा खबर्‍या होता त्यामुळे आमच्या जनलढाईला धोका निर्माण झाला होता. अशा लोकांना अशीच शिक्षा मिळणार अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली. विशेष म्हणजे कोरेटी यांच्यावर शासकीय ग्राम आरोग्य पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2012 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close