S M L

प्राध्यापक बहिष्कारावर ठाम, विद्यार्थ्यांना फूटला घाम

11 मेराज्य सरकारच्या इशार्‍यानंतर सुध्दा राज्यातील 10 विद्यापीठातील 40 हजार प्राध्यपकांनी उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार कामय ठेवण्याचा निर्णय एमफुक्टो संघटनेने कामय ठेवला आहे. राज्यभरात महाविद्यालयांच्या परीक्षा झाल्या.. पण निकाल वेळेवर लागेल की नाही, याची खात्री नाही. कारणा राज्यातले एम-फुक्टो संघटनेचे 30 हजाराहून जास्त प्राध्यापक गेल्या 42 दिवसांपासून अघोषित संपावर आहेत. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर आम्ही उत्तरपत्रिका तपासणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्य सरकारशी चर्चेच्या फेर्‍या झाल्या.. अनेक मागण्या मान्यही झाल्या. पण 3 मागण्यांवर गाडी अडली आहे. - 431 कोटींची थकबाकी राज्य सरकारने तातडीने देण्याबाबत लिखित आश्वासन- 1550 कोटींची थकबाकी केंद्राकडून मिळेल, याचं लिखित आश्वासन- नेट सेट न झालेल्या प्राध्यापकांना सेवेत कायम ठेवाशुक्रवारपर्यंत प्राध्यापकांनी कामाला सुरवात नाही केली, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी ताकीद उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तरीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय एम फुक्टोने घेतला. प्राध्यापकांवर कारवाई करावी नाही तर एम फुक्टोच्या पदाधिकार्‍यांसह प्राध्यापकांना घेराव घालू असा इशाहा आता अभाविपनं दिला आहे.प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे निकाल वेळेवर लागले नाही तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल आणि कंत्राटी आणि हंगामी प्राध्यापकांनी पेपर तपासले, तर मूल्यांकनाच्या दर्जावर परिणाम होईल. परीक्षा झाल्यापासून 45 दिवसात निकाल लावण्याचे बंधन 1994 च्या विद्यापीठ कायद्यान्वये सरकारवर आहे. आता हे आव्हान सरकार पेलणार कसं.. कारवाईचा बडगा उगारून की सामोपचाराच्या तोडग्याने.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 04:27 PM IST

प्राध्यापक बहिष्कारावर ठाम, विद्यार्थ्यांना फूटला घाम

11 मे

राज्य सरकारच्या इशार्‍यानंतर सुध्दा राज्यातील 10 विद्यापीठातील 40 हजार प्राध्यपकांनी उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार कामय ठेवण्याचा निर्णय एमफुक्टो संघटनेने कामय ठेवला आहे.

राज्यभरात महाविद्यालयांच्या परीक्षा झाल्या.. पण निकाल वेळेवर लागेल की नाही, याची खात्री नाही. कारणा राज्यातले एम-फुक्टो संघटनेचे 30 हजाराहून जास्त प्राध्यापक गेल्या 42 दिवसांपासून अघोषित संपावर आहेत. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर आम्ही उत्तरपत्रिका तपासणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्य सरकारशी चर्चेच्या फेर्‍या झाल्या.. अनेक मागण्या मान्यही झाल्या. पण 3 मागण्यांवर गाडी अडली आहे.

- 431 कोटींची थकबाकी राज्य सरकारने तातडीने देण्याबाबत लिखित आश्वासन- 1550 कोटींची थकबाकी केंद्राकडून मिळेल, याचं लिखित आश्वासन- नेट सेट न झालेल्या प्राध्यापकांना सेवेत कायम ठेवा

शुक्रवारपर्यंत प्राध्यापकांनी कामाला सुरवात नाही केली, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी ताकीद उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तरीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय एम फुक्टोने घेतला. प्राध्यापकांवर कारवाई करावी नाही तर एम फुक्टोच्या पदाधिकार्‍यांसह प्राध्यापकांना घेराव घालू असा इशाहा आता अभाविपनं दिला आहे.

प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे निकाल वेळेवर लागले नाही तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल आणि कंत्राटी आणि हंगामी प्राध्यापकांनी पेपर तपासले, तर मूल्यांकनाच्या दर्जावर परिणाम होईल. परीक्षा झाल्यापासून 45 दिवसात निकाल लावण्याचे बंधन 1994 च्या विद्यापीठ कायद्यान्वये सरकारवर आहे. आता हे आव्हान सरकार पेलणार कसं.. कारवाईचा बडगा उगारून की सामोपचाराच्या तोडग्याने.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close