S M L

सिंचन प्रकल्पांपेक्षा, हत्ती पोसणं स्वस्त ?

13 मेसंपूर्ण राज्य आज दुष्काळाच्या आगीत होरपळतंय. पाण्यासाठी दोन महिलांनाआपला जीव गमवावा लागला आहे. पण या पाणी टंचाईला अपूर्ण धरणं आणि त्यात झालेले घोटाळे जबाबदार आहे. सिंचनावर आज हजारो कोटी खर्च झाले पण यातून फक्त 0.1 टक्केच वाढ झाली.अनेक प्रकल्पांचा खर्च दुप्पटी, तिप्पटीने नाहीतर 11 पटीने खर्च वाढला आहे. दरवर्षी सर्वाधिक पावसाची नोंद होणार्‍या कोकणात ही कुठे तरी पाणी मुरतंय ? त्यामुळेच 77 प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे. कोकण परिसरातल्या पाटबंधारे प्रकल्पांच्या विकासासाठी 1998 साली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळांतर्गत कोकणात 90 जलसिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. पण जी परिस्थिती विदर्भात आहे तोच कित्ता इथंही गिरवला आहे. त्यामुळे या प्रकल्पांपेक्षा हत्ती पोसणं स्वस्त असेल असा प्रश्न हमखास सर्वसामान्य जनतेचा मनात उपस्थिती होईल.कोकणच्या सिंचन प्रकल्पांच्या खर्चात 11 पट वाढ- टाळंबा हा कोकणातला पाटबंधारे प्रकल्प 1984 साली सुरू झाला. तो 2006 साली पूर्ण होणार होता. आता हा प्रकल्प 2017 मध्ये पूर्ण होईल. 11 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा सुरूवातीचा खर्च होता 72 कोटी आणि आता तो पोहोचलाय 758 कोटींवर... म्हणजे प्रकल्पावरचा नियोजित खर्च जवळपास दहा पटींनी वाढला आहे. - रखडलेला आणखी एक प्रकल्प म्हणजे सूर्या प्रकल्प. हा प्रकल्प 1973 साली सुरू झाला. 1984 साली तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण तो आता 2013 साली पूर्ण होणार आहे. म्हणजे हा प्रकल्प तो 29 वर्ष रखडला आहे. प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च होता 19 कोटी. आता तो पोचलाय 668 कोटींवर. म्हणजे मूळ खर्चाच्या 35 पट खर्च वाढला आहे. - भातसा प्रकल्पाची अवस्था. हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. अनेक वर्ष रखडल्यानंतर आता तो 2015 पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च होता 14 कोटी. तो वाढून गेलाय 754 कोटींवर... म्हणजे मूळ खर्चात 54 पटींनी वाढ झाली. - तिलारी हा आंतरराज्यीय प्रकल्पसुद्धा रखडलाय. 1996 साली तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण तो आता पूर्ण होणार आहे 2012 साली. म्हणजे प्रकल्प 16 वर्ष रखडला. या प्रकल्पाची मूळ किंमत होती 45 कोटी. ती आता पोचलीय 1 हजार 652 कोटींवर. म्हणजे प्रकल्पाच्या खर्चात मूळ खर्चाच्या जवळपास 37 पटींनी वाढ झाली आहे. तापीच्या खोर्‍यात किती पैसा मुरलाय ?उत्तर महाराष्ट्राच्या सिंचनासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळांतर्गत 7 मोठे प्रकल्प 23 मध्यम प्रकल्प 91 लघु प्रकल्प, 4 विस्तारित कालवे, 4 उपसा सिंचन योजना आणि 23 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असे एकूण 152 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.- तापी खोर्‍यातला निम्न तापी हा प्रकल्प 1999 ला सुरू झाला. तो 2005 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण आता 10 वर्ष उशिरा म्हणजे 2015मध्ये पूर्ण होणार आहे. त्याचा खर्चही 143 कोटींवरून 1128 कोटींवर गेलाय. म्हणजे प्रकल्पाच्या खर्चात 985 कोटींची वाढ झाली आहे. म्हणजे जवळपास 8 पटींची वाढ आहे.-पुणंद हा प्रकल्प 1982 साली सुरू झाला. तो चार वर्षात म्हणजे 1986 साली तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण हा प्रकल्प 26 वर्षं रखडल्यानंतर आता 2012 साली पूर्ण होणार आहे. आणि प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च होता फक्त 9 कोटी रुपये. तो आता वाढून झालाय 217 कोटी रुपये.. म्हणजे जवळपास 24 पट वाढ झाली आहे. - तापी खोर्‍यातल्या 7 मोठ्या प्रकल्पांचा एकत्रित विचार केला तर एकूण नियोजित खर्च होता 2945 कोटी आणि आता तो गेलाय 4801 कोटींवर.. म्हणजे हा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. मराठवाड्यात प्रकल्प 'कोटी कोटीने' वाढले !सिंचनाच्या बाबतीत राज्याच्या इतर विभागांसारखीच स्थिती मराठवाड्याची आहे. मराठवाड्यात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत आज 13 मोठे प्रकल्प, 19 मध्यम, 306 लघु प्रकल्पांची कामं सुरू आहेत. तर 7 प्रकल्पांच्या नूतनीकरणाची सिंचन योजनांची कामं सुरू आहे. - निम्न दुधना प्रकल्प हा 2014 साली पूर्ण होणार आहे. सुरुवातीला 1 हजार 26 कोटींचा असलेला हा प्रकल्प आता 1420 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे 394 कोटींची वाढ या प्रकल्पात झाली आहे. - नांदेड जिल्हयातला लेंडी प्रकल्पसुद्धा अर्धवट स्थितीत आहे. या प्रकल्पाची किंमत आता 464 कोटींवरून 799 कोटींवर गेलीय. म्हणजे योजनेच्या खर्चात 335 कोटींची वाढ झाली आहे. - नांदेडचा बाभळी बंधारा प्रकल्पही 32 कोटींवरून 300 कोटींवर गेलाय. हा प्रकल्प सुद्धा अनेक वर्षं रखडलेला आहे. या प्रकल्पाच्या खर्चात 268 कोटींची वाढ झालीय. म्हणजे जवळपास दहा पटींची वाढ आहे.- औरंगाबादचा शिवना टाकळी प्रकल्पसुद्धा अपूर्णावस्थेत आहे. हा प्रकल्प त्याच्या 8 कोटी या मूळ किंमतीवरून आता 228 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे प्रकल्पाच्या खर्चात जवळपास 28 पटींनी वाढ झाली आहे. धरण घोटाळा: कुठं मुरतंय पाणी ?प. महाराष्ट्र : 155 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 4,195 कोटीआतापर्यंत खर्च : 9,980 कोटीनिधीची गरज : 8,064 कोटीविदर्भ : 341 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 10,614 कोटीआतापर्यंत खर्च : 15,157 कोटीअति. निधीची गरज : 33,051 कोटीकोकण : 77 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 957 कोटीआतापर्यंत खर्च : 4,209 कोटीअति. निधीची गरज : 6,012 कोटीउ. महाराष्ट्र : 152 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 5,794 कोटीआतापर्यंत खर्च : 3,526 कोटीअति. निधीची गरज : 9,116 कोटीमराठवाडा : 345 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 7,035 कोटीआतापर्यंत खर्च : 3,120 कोटीअति. निधीची गरज : 5,512 कोटीकाल आणि आज या दोन दिवसांत आम्ही तुमच्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सिंचन योजनांचं चित्र मांडलंय. सिंचन योजनांवर कोट्यवधींचा खर्च झाला.पण प्रकल्प झालेले नाहीत. म्हणजे हजारो कोटींचा धरण घोटाळा झाल्याचं दिसतंय. यावरुन काही प्रश्न उपस्थित होत आहे. आयबीएन लोकमतचे सवाल 1) रखडलेले सिंचन प्रकल्प आणि वाढलेला खर्च याची जबाबदारी कुणाची आहे ?2) सिंचन प्रकल्पांवर वाढणार्‍या खर्चाची वेळोवेळी जनतेला सविस्तर माहिती का देण्यात येत नाही ?3) सिंचन प्रकल्पांच्या कामावर देखरेख ठेवणारी कायमस्वरूपी यंत्रणा का नाही ?4) सिंचन प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर कोणतीच कारवाई का होत नाही ?5) गेल्या 20 वर्षांत गब्बर झालेले हे कंत्राटदार कोण आहेत ?6) या कंत्राटदारांचे राजकीय नेत्यांशी कोणते संबंध आहेत ?7) रखडलेल्या प्रकल्पांसाठी संबंधित मंत्र्याला आणि वरिष्ठ अधिकार्‍याला जबाबदार का धरण्यात येत नाही ?8) जनतेच्या पैशातून उभारण्यात येणार्‍या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर यासाठी सरकार जबाबदार नाही का ?9) या भ्रष्टाचाराची CBI चौकशी करण्याची गरज आहे का ?

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2012 09:39 AM IST

सिंचन प्रकल्पांपेक्षा, हत्ती पोसणं स्वस्त ?

13 मे

संपूर्ण राज्य आज दुष्काळाच्या आगीत होरपळतंय. पाण्यासाठी दोन महिलांनाआपला जीव गमवावा लागला आहे. पण या पाणी टंचाईला अपूर्ण धरणं आणि त्यात झालेले घोटाळे जबाबदार आहे. सिंचनावर आज हजारो कोटी खर्च झाले पण यातून फक्त 0.1 टक्केच वाढ झाली.अनेक प्रकल्पांचा खर्च दुप्पटी, तिप्पटीने नाहीतर 11 पटीने खर्च वाढला आहे. दरवर्षी सर्वाधिक पावसाची नोंद होणार्‍या कोकणात ही कुठे तरी पाणी मुरतंय ? त्यामुळेच 77 प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे. कोकण परिसरातल्या पाटबंधारे प्रकल्पांच्या विकासासाठी 1998 साली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळांतर्गत कोकणात 90 जलसिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. पण जी परिस्थिती विदर्भात आहे तोच कित्ता इथंही गिरवला आहे. त्यामुळे या प्रकल्पांपेक्षा हत्ती पोसणं स्वस्त असेल असा प्रश्न हमखास सर्वसामान्य जनतेचा मनात उपस्थिती होईल.

कोकणच्या सिंचन प्रकल्पांच्या खर्चात 11 पट वाढ

- टाळंबा हा कोकणातला पाटबंधारे प्रकल्प 1984 साली सुरू झाला. तो 2006 साली पूर्ण होणार होता. आता हा प्रकल्प 2017 मध्ये पूर्ण होईल. 11 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा सुरूवातीचा खर्च होता 72 कोटी आणि आता तो पोहोचलाय 758 कोटींवर... म्हणजे प्रकल्पावरचा नियोजित खर्च जवळपास दहा पटींनी वाढला आहे.

- रखडलेला आणखी एक प्रकल्प म्हणजे सूर्या प्रकल्प. हा प्रकल्प 1973 साली सुरू झाला. 1984 साली तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण तो आता 2013 साली पूर्ण होणार आहे. म्हणजे हा प्रकल्प तो 29 वर्ष रखडला आहे. प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च होता 19 कोटी. आता तो पोचलाय 668 कोटींवर. म्हणजे मूळ खर्चाच्या 35 पट खर्च वाढला आहे.

- भातसा प्रकल्पाची अवस्था. हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. अनेक वर्ष रखडल्यानंतर आता तो 2015 पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च होता 14 कोटी. तो वाढून गेलाय 754 कोटींवर... म्हणजे मूळ खर्चात 54 पटींनी वाढ झाली.

- तिलारी हा आंतरराज्यीय प्रकल्पसुद्धा रखडलाय. 1996 साली तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण तो आता पूर्ण होणार आहे 2012 साली. म्हणजे प्रकल्प 16 वर्ष रखडला. या प्रकल्पाची मूळ किंमत होती 45 कोटी. ती आता पोचलीय 1 हजार 652 कोटींवर. म्हणजे प्रकल्पाच्या खर्चात मूळ खर्चाच्या जवळपास 37 पटींनी वाढ झाली आहे.

तापीच्या खोर्‍यात किती पैसा मुरलाय ?

उत्तर महाराष्ट्राच्या सिंचनासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळांतर्गत 7 मोठे प्रकल्प 23 मध्यम प्रकल्प 91 लघु प्रकल्प, 4 विस्तारित कालवे, 4 उपसा सिंचन योजना आणि 23 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असे एकूण 152 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

- तापी खोर्‍यातला निम्न तापी हा प्रकल्प 1999 ला सुरू झाला. तो 2005 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण आता 10 वर्ष उशिरा म्हणजे 2015मध्ये पूर्ण होणार आहे. त्याचा खर्चही 143 कोटींवरून 1128 कोटींवर गेलाय. म्हणजे प्रकल्पाच्या खर्चात 985 कोटींची वाढ झाली आहे. म्हणजे जवळपास 8 पटींची वाढ आहे.

-पुणंद हा प्रकल्प 1982 साली सुरू झाला. तो चार वर्षात म्हणजे 1986 साली तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण हा प्रकल्प 26 वर्षं रखडल्यानंतर आता 2012 साली पूर्ण होणार आहे. आणि प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च होता फक्त 9 कोटी रुपये. तो आता वाढून झालाय 217 कोटी रुपये.. म्हणजे जवळपास 24 पट वाढ झाली आहे.

- तापी खोर्‍यातल्या 7 मोठ्या प्रकल्पांचा एकत्रित विचार केला तर एकूण नियोजित खर्च होता 2945 कोटी आणि आता तो गेलाय 4801 कोटींवर.. म्हणजे हा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे.

मराठवाड्यात प्रकल्प 'कोटी कोटीने' वाढले !

सिंचनाच्या बाबतीत राज्याच्या इतर विभागांसारखीच स्थिती मराठवाड्याची आहे. मराठवाड्यात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत आज 13 मोठे प्रकल्प, 19 मध्यम, 306 लघु प्रकल्पांची कामं सुरू आहेत. तर 7 प्रकल्पांच्या नूतनीकरणाची सिंचन योजनांची कामं सुरू आहे.

- निम्न दुधना प्रकल्प हा 2014 साली पूर्ण होणार आहे. सुरुवातीला 1 हजार 26 कोटींचा असलेला हा प्रकल्प आता 1420 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे 394 कोटींची वाढ या प्रकल्पात झाली आहे.

- नांदेड जिल्हयातला लेंडी प्रकल्पसुद्धा अर्धवट स्थितीत आहे. या प्रकल्पाची किंमत आता 464 कोटींवरून 799 कोटींवर गेलीय. म्हणजे योजनेच्या खर्चात 335 कोटींची वाढ झाली आहे.

- नांदेडचा बाभळी बंधारा प्रकल्पही 32 कोटींवरून 300 कोटींवर गेलाय. हा प्रकल्प सुद्धा अनेक वर्षं रखडलेला आहे. या प्रकल्पाच्या खर्चात 268 कोटींची वाढ झालीय. म्हणजे जवळपास दहा पटींची वाढ आहे.

- औरंगाबादचा शिवना टाकळी प्रकल्पसुद्धा अपूर्णावस्थेत आहे. हा प्रकल्प त्याच्या 8 कोटी या मूळ किंमतीवरून आता 228 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे प्रकल्पाच्या खर्चात जवळपास 28 पटींनी वाढ झाली आहे.

धरण घोटाळा: कुठं मुरतंय पाणी ?

प. महाराष्ट्र : 155 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 4,195 कोटीआतापर्यंत खर्च : 9,980 कोटीनिधीची गरज : 8,064 कोटी

विदर्भ : 341 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 10,614 कोटीआतापर्यंत खर्च : 15,157 कोटीअति. निधीची गरज : 33,051 कोटी

कोकण : 77 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 957 कोटीआतापर्यंत खर्च : 4,209 कोटीअति. निधीची गरज : 6,012 कोटी

उ. महाराष्ट्र : 152 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 5,794 कोटीआतापर्यंत खर्च : 3,526 कोटीअति. निधीची गरज : 9,116 कोटी

मराठवाडा : 345 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 7,035 कोटीआतापर्यंत खर्च : 3,120 कोटीअति. निधीची गरज : 5,512 कोटी

काल आणि आज या दोन दिवसांत आम्ही तुमच्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सिंचन योजनांचं चित्र मांडलंय. सिंचन योजनांवर कोट्यवधींचा खर्च झाला.पण प्रकल्प झालेले नाहीत. म्हणजे हजारो कोटींचा धरण घोटाळा झाल्याचं दिसतंय. यावरुन काही प्रश्न उपस्थित होत आहे.

आयबीएन लोकमतचे सवाल

1) रखडलेले सिंचन प्रकल्प आणि वाढलेला खर्च याची जबाबदारी कुणाची आहे ?2) सिंचन प्रकल्पांवर वाढणार्‍या खर्चाची वेळोवेळी जनतेला सविस्तर माहिती का देण्यात येत नाही ?3) सिंचन प्रकल्पांच्या कामावर देखरेख ठेवणारी कायमस्वरूपी यंत्रणा का नाही ?4) सिंचन प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर कोणतीच कारवाई का होत नाही ?5) गेल्या 20 वर्षांत गब्बर झालेले हे कंत्राटदार कोण आहेत ?6) या कंत्राटदारांचे राजकीय नेत्यांशी कोणते संबंध आहेत ?7) रखडलेल्या प्रकल्पांसाठी संबंधित मंत्र्याला आणि वरिष्ठ अधिकार्‍याला जबाबदार का धरण्यात येत नाही ?8) जनतेच्या पैशातून उभारण्यात येणार्‍या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर यासाठी सरकार जबाबदार नाही का ?9) या भ्रष्टाचाराची CBI चौकशी करण्याची गरज आहे का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close