S M L

पुणे वॉरियर्सची आता प्रतिष्ठेची लढाई

11 मेसौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्ससमोर आव्हान आहे ते बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं. पुणे वॉरिअर्सचे या हंगामात आतापर्यंत 9 पराभव झाले आहे. यात होम ग्राऊंडवर 4 पराभवांची नामुष्कीही टीमवर ओढावली आहे. कॅप्टन सौरव गांगुली, जेसी रायडर, मायेकल क्लार्क, स्टिव्हन स्मिथ असे दर्जेदार बॅट्समनंही पुणे टीमचे पराभव रोखू शकले नाहीत. टीमचं स्पर्धेतलं आव्हान केव्हाच संपलय, पण उरलेल्या मॅचमध्ये विजय मिळवत प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न पुणे टीमचा असेल. पण हे आव्हान पुणे टीमला सोप नसणार, कारण बंगलोरची टीम सध्या चांगलीच फॉर्मात आहे. पॉईंट टेबलमध्ये 13 पॉईंट्ससह टीम चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या मॅचमध्ये मुंबईचा बंगलोरने 9 विकेटने दणदणीत पराभव केल्यानं टीमचा आत्मविश्वासही वाढला आहे. ख्रिस गेल मैदानावर टीकला तर विजय निश्चित हे समीकरण वानखेडेवरही खरं ठरलंय आणि त्यामुळे प्ले ऑफमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी गेलवर टीमची मदार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 12:30 PM IST

पुणे वॉरियर्सची आता प्रतिष्ठेची लढाई

11 मे

सौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्ससमोर आव्हान आहे ते बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं. पुणे वॉरिअर्सचे या हंगामात आतापर्यंत 9 पराभव झाले आहे. यात होम ग्राऊंडवर 4 पराभवांची नामुष्कीही टीमवर ओढावली आहे. कॅप्टन सौरव गांगुली, जेसी रायडर, मायेकल क्लार्क, स्टिव्हन स्मिथ असे दर्जेदार बॅट्समनंही पुणे टीमचे पराभव रोखू शकले नाहीत. टीमचं स्पर्धेतलं आव्हान केव्हाच संपलय, पण उरलेल्या मॅचमध्ये विजय मिळवत प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न पुणे टीमचा असेल. पण हे आव्हान पुणे टीमला सोप नसणार, कारण बंगलोरची टीम सध्या चांगलीच फॉर्मात आहे. पॉईंट टेबलमध्ये 13 पॉईंट्ससह टीम चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या मॅचमध्ये मुंबईचा बंगलोरने 9 विकेटने दणदणीत पराभव केल्यानं टीमचा आत्मविश्वासही वाढला आहे. ख्रिस गेल मैदानावर टीकला तर विजय निश्चित हे समीकरण वानखेडेवरही खरं ठरलंय आणि त्यामुळे प्ले ऑफमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी गेलवर टीमची मदार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close