S M L

पाण्यासाठी नागरीकांकडून कार्यालयाची तोडफोड

11 मेमुंबई महापालिकेच्या कुर्ल्याच्या एल वॉर्डमध्ये आज दुपारी नागरिकांनी पाण्याच्या समस्येसाठी कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. यात 10 महिलांचा समावेश आहे. कुर्ला पश्चिममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. पाण्याच्या समस्येने स्थानिक त्रस्त आहेत. पण पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी काहीच करीत नाहीत उलट उडवाउडवीची उत्तरं देतात. आज काही स्थानिक कार्यालयात गेले असताना तिथे अधिकारी आणि लोकांमध्ये खडाजंगी झाली. याप्रसंगी तोडफोड झाली आणि अधिकार्‍यांना धक्काबुकी करण्यात आली. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 04:49 PM IST

पाण्यासाठी नागरीकांकडून कार्यालयाची तोडफोड

11 मे

मुंबई महापालिकेच्या कुर्ल्याच्या एल वॉर्डमध्ये आज दुपारी नागरिकांनी पाण्याच्या समस्येसाठी कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. यात 10 महिलांचा समावेश आहे. कुर्ला पश्चिममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. पाण्याच्या समस्येने स्थानिक त्रस्त आहेत. पण पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी काहीच करीत नाहीत उलट उडवाउडवीची उत्तरं देतात. आज काही स्थानिक कार्यालयात गेले असताना तिथे अधिकारी आणि लोकांमध्ये खडाजंगी झाली. याप्रसंगी तोडफोड झाली आणि अधिकार्‍यांना धक्काबुकी करण्यात आली. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close