S M L

टी-20 मध्ये पाकची टीम सहभागी होणार

12 मेयावर्षी होणार्‍या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानच्या टीमला निमंत्रण देण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी आज चेन्नईत याची अधिकृत घोषणा केली. पाकिस्तानची सियालकोट स्टॅलियन्स ही टीम यावर्षीच्या चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी होणार आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानची टीम किंवा पाकिस्तानच्या खेळाडूला भारतात खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण आता तब्बल चार वर्षांननंतर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळणार आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यानही लवकरच क्रिकेट सीरिज खेळवली जाईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जातेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2012 02:35 PM IST

टी-20 मध्ये पाकची टीम सहभागी होणार

12 मे

यावर्षी होणार्‍या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानच्या टीमला निमंत्रण देण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी आज चेन्नईत याची अधिकृत घोषणा केली. पाकिस्तानची सियालकोट स्टॅलियन्स ही टीम यावर्षीच्या चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी होणार आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानची टीम किंवा पाकिस्तानच्या खेळाडूला भारतात खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण आता तब्बल चार वर्षांननंतर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळणार आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यानही लवकरच क्रिकेट सीरिज खेळवली जाईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2012 02:35 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close