S M L

एअर इंडियाच्या पायलट्सचा संप काही संपेना

14 मेएअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा आज सातवा दिवस उजाडला असून संपावर आपण ठाम असल्याचं संघटनेनं ठणकावून सांगितलं आहे. या संपामुळे आज 8 आंतरराष्ट्रीय आणि 6 देशांतर्गत उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. यात सरकारचे जवळपास 96 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. आतापर्यंत 71 पायलट्सना बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या एअर इंडिया एक्झिक्युटिव्ह पायलटस् असोसिएशनच्या मदतीनं एअर इंडियाचं काम सुरू आहे. पण त्यांनाही आता या संपाला पाठिंबा दिला आहे. पालयट्सची ही संघटना जर संपात उतरली तर एअर इंडियाचा आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणंही रद्द करावी लागणार आहेत. दरम्यान, हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी आयबीएन नेटवर्कच्या एका कार्यक्रमात एअर इंडियाच्या खाजगीकरणाचे संकेत दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2012 10:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2012 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close