S M L

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग ?

15 मेअल्पावधितच लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या इंडियन प्रिमीयर लीगवर आता स्पॉट फिक्सिंगचे आरोप होत आहे. एका न्यूज चॅनलने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये हा खुलासा झाला आहे. या स्टिंगमध्ये आयपीएलसाठी स्पॉट फिक्सिंग केल्याचं थेट स्पष्ट होत नसलं तरी अनेक खेळाडूंनी लिलावात मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त पैसा अनधिकृतपणे मिळत असल्याचं कबूल केलंय. बीसीसीआयनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. स्टिंग ऑपरेशनचं संपूर्ण फुटेज मागवून त्यांची शाहनीशा केली जाईल, असं बीसीसीआयनं म्हटलंय. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कारवाई करु, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलंय. याबाबत चर्चा करण्यासाठी बोर्डाची आज एक आपतकालीन बैठकही बोलवण्यात आली आहेत. फक्त भारतीय क्रिकेट खेळाडूच नाही तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि टीमचे मालकही यात सहभागी असल्याचा खुलासा खेळाडूंनी केल्याचा टीव्ही चॅनलचा दावा आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा शलभ श्रीवास्तव आणि अमित यादव, पुणे वॉरियर्सचा मोहनिश मिश्रा आणि डेक्कन चार्जर्सचा टी. पी. सुधींद्र यांना या स्टिंगमध्ये दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, सहारानं एक पत्रक काढून याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मोहनिश मिश्रा किंवा इतर कुठल्याही खेळाडूला बीसीसीआयनं निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम दिल्याचा वृत्ताचा सहारा खंडन करतं. (स्टिंग ऑपरेशनमध्ये) मोहनिश मिश्रा आणि शलभ श्रीवास्तवनं केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2012 10:06 AM IST

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग ?

15 मे

अल्पावधितच लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या इंडियन प्रिमीयर लीगवर आता स्पॉट फिक्सिंगचे आरोप होत आहे. एका न्यूज चॅनलने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये हा खुलासा झाला आहे. या स्टिंगमध्ये आयपीएलसाठी स्पॉट फिक्सिंग केल्याचं थेट स्पष्ट होत नसलं तरी अनेक खेळाडूंनी लिलावात मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त पैसा अनधिकृतपणे मिळत असल्याचं कबूल केलंय.

बीसीसीआयनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. स्टिंग ऑपरेशनचं संपूर्ण फुटेज मागवून त्यांची शाहनीशा केली जाईल, असं बीसीसीआयनं म्हटलंय. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कारवाई करु, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलंय. याबाबत चर्चा करण्यासाठी बोर्डाची आज एक आपतकालीन बैठकही बोलवण्यात आली आहेत.

फक्त भारतीय क्रिकेट खेळाडूच नाही तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि टीमचे मालकही यात सहभागी असल्याचा खुलासा खेळाडूंनी केल्याचा टीव्ही चॅनलचा दावा आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा शलभ श्रीवास्तव आणि अमित यादव, पुणे वॉरियर्सचा मोहनिश मिश्रा आणि डेक्कन चार्जर्सचा टी. पी. सुधींद्र यांना या स्टिंगमध्ये दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, सहारानं एक पत्रक काढून याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मोहनिश मिश्रा किंवा इतर कुठल्याही खेळाडूला बीसीसीआयनं निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम दिल्याचा वृत्ताचा सहारा खंडन करतं. (स्टिंग ऑपरेशनमध्ये) मोहनिश मिश्रा आणि शलभ श्रीवास्तवनं केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2012 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close