S M L

अन् खार्‍या पाण्याची चवं झाली गोडं !

14 मेरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फरारी भुईवाडी येथे खार्‍या पाण्यामुळे गावकर्‍यांचे अतोनात हाल होत होते. इथल्या गावकर्‍यांना दरवर्षी उन्हाळ्यात जवळची खाडी पार करून गुहागर तालुक्यातून बोटीतनं पाणी आणावं लागत होतं. दहा हंड्यासाठी त्यासाठी जवळपास दोन तास बोटीतून प्रवास करावा लागत होता. या गावाची समस्या लक्षात घेऊन चिपळूणमधल्या परिवर्तन संस्थेनं बीआरसीच्या मदतीनं खारं पाणी गोडं करण्याचं यंत्र बसवलं आहे. त्यामुळे तहानेने व्याकूळ कुटुंबाची तहान भागविली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात भुईवाडी येथील गावकर्‍यांना पाण्यासाठी लगतची खाडी पार करून जीव मुठीत घेऊन गुहागर तालुक्यातील परचुरी या गावातून दहा हंडे पाणी बोटीतून आणून तहान भागविण्याची वेऴ या गावकर्‍यांवर आली होती. दहा हंडे पाण्यासाठी येथील कुटुंबांना दोन तास खाडीचा ख़डतर प्रवास बोटीतून करावा लागत होता. या गावाची पाणी समस्या लक्षात घेऊन चिपळुन येथील 'परिवर्तन संस्था' यांनी बी.आर.सी. यांच्या सहाय्याने खारे पाणी गोडे करण्याचे यंत्र बसवून तहानेने व्याकूळ कुटुंबाची तहान भागविली आहे. कोकणात खाडी किनारी कित्येक गावे खार्‍या पाण्यामुळे तहानलेली आहेत. अशा प्रकारे खार्‍या पाण्यावर गोड्या पाण्याचा प्रयोग केल्यावर कोकण किनारपट्टी पाणी समस्येतून मुक्त होऊन त्यांची तहान भागेल. मात्र, त्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. हा कोकणातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. एक हजार लीटर खार्‍या पाण्यातून 150 लिटर गोडं पाणी मिळते. खार्‍या पाणी 1700 टीडीएस (TDS) असते. यातून तयार झालेले पाणी 70टीडीएसचे आहे. सामान्यपणे आपण 150 टीडीएसपर्यंतचे पाणी पिऊ शकतो. हे पाणी 70टीडीएसचे आहे. म्हणजे हे शुद्ध आहे. एका तासात 150 लिटर पाणी फिल्टर होऊन मिळते. परंतू यामध्ये वेस्टेज चे प्रमाण अधिक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2012 03:24 PM IST

अन् खार्‍या पाण्याची चवं झाली गोडं !

14 मे

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फरारी भुईवाडी येथे खार्‍या पाण्यामुळे गावकर्‍यांचे अतोनात हाल होत होते. इथल्या गावकर्‍यांना दरवर्षी उन्हाळ्यात जवळची खाडी पार करून गुहागर तालुक्यातून बोटीतनं पाणी आणावं लागत होतं. दहा हंड्यासाठी त्यासाठी जवळपास दोन तास बोटीतून प्रवास करावा लागत होता. या गावाची समस्या लक्षात घेऊन चिपळूणमधल्या परिवर्तन संस्थेनं बीआरसीच्या मदतीनं खारं पाणी गोडं करण्याचं यंत्र बसवलं आहे. त्यामुळे तहानेने व्याकूळ कुटुंबाची तहान भागविली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात भुईवाडी येथील गावकर्‍यांना पाण्यासाठी लगतची खाडी पार करून जीव मुठीत घेऊन गुहागर तालुक्यातील परचुरी या गावातून दहा हंडे पाणी बोटीतून आणून तहान भागविण्याची वेऴ या गावकर्‍यांवर आली होती. दहा हंडे पाण्यासाठी येथील कुटुंबांना दोन तास खाडीचा ख़डतर प्रवास बोटीतून करावा लागत होता. या गावाची पाणी समस्या लक्षात घेऊन चिपळुन येथील 'परिवर्तन संस्था' यांनी बी.आर.सी. यांच्या सहाय्याने खारे पाणी गोडे करण्याचे यंत्र बसवून तहानेने व्याकूळ कुटुंबाची तहान भागविली आहे. कोकणात खाडी किनारी कित्येक गावे खार्‍या पाण्यामुळे तहानलेली आहेत. अशा प्रकारे खार्‍या पाण्यावर गोड्या पाण्याचा प्रयोग केल्यावर कोकण किनारपट्टी पाणी समस्येतून मुक्त होऊन त्यांची तहान भागेल. मात्र, त्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. हा कोकणातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. एक हजार लीटर खार्‍या पाण्यातून 150 लिटर गोडं पाणी मिळते. खार्‍या पाणी 1700 टीडीएस (TDS) असते. यातून तयार झालेले पाणी 70टीडीएसचे आहे. सामान्यपणे आपण 150 टीडीएसपर्यंतचे पाणी पिऊ शकतो. हे पाणी 70टीडीएसचे आहे. म्हणजे हे शुद्ध आहे. एका तासात 150 लिटर पाणी फिल्टर होऊन मिळते. परंतू यामध्ये वेस्टेज चे प्रमाण अधिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2012 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close