S M L

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.वासुदेव गाडे

15 मेगेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद अखेर भरण्यात आलं आहे. जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. वासुदेव गाडे यांची कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकर नारायण यांनी याबाबत आज मंगळवारी घोषणा केली. डॉ.गाडे हे महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपदी कार्यरत आहे. मागिल वर्षी 15 सप्टेंबरला डॉ. आर.के. शेवगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरुंच्या हाती होती. आता डॉ. गाडे यांच्या कुलगुरुपदासाठी पाच वर्षासाठीचा कार्यकाळ असणार आहे.गाडे यांनी जैवविज्ञान या विषयात एम.एस्सी, एम.फिल आणि पीएचडी मिळवली आहे. तसेच फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्ष पोस्ट डॉक्टरेल फेलो होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2012 04:33 PM IST

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.वासुदेव गाडे

15 मे

गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद अखेर भरण्यात आलं आहे. जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. वासुदेव गाडे यांची कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकर नारायण यांनी याबाबत आज मंगळवारी घोषणा केली. डॉ.गाडे हे महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपदी कार्यरत आहे. मागिल वर्षी 15 सप्टेंबरला डॉ. आर.के. शेवगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरुंच्या हाती होती. आता डॉ. गाडे यांच्या कुलगुरुपदासाठी पाच वर्षासाठीचा कार्यकाळ असणार आहे.गाडे यांनी जैवविज्ञान या विषयात एम.एस्सी, एम.फिल आणि पीएचडी मिळवली आहे. तसेच फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्ष पोस्ट डॉक्टरेल फेलो होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2012 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close