S M L

ठाण्यात जकात एजंटच्या संपामुळे ट्रॅफिक जाम

16 मेठाण्यातल्या आनंदनगर जकात नाक्यावर एजंटस्‌नी काम बंद केलं आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहनांच्या लांबच लांब लांब रांगा लागल्या आहेत परिणामी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम झालंआहे. काल मंगळवारी मुंबईतल्या सर्व जकात नाक्यांवर अँटी करप्शन विभागाने छापे टाकले होते. याप्रकरणी गैरव्यवहार करणार्‍या 12 जणांना अँटी करप्शनच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेवून पालिकेच्या जकात दक्षता विभागाकडे सुपूर्द केलंय. अँटी करप्शनच्या या कारवाईचा निषेध करत एजंटस्‌नी कामबंद केलं आहे.दरम्यान कालच्या कारवाईत 12 जकात अधिकार्‍यांना अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतलं आहे. यामध्ये सुपरीटेडंट आणि जकात इन्सपेक्टरचा समावेश आहे. तर 50 पेक्षा जास्त जकात एजंटना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्वांची चौकशी सुरु आहे. तर या कारवाई दरम्यान, 50 वाहने जप्त करण्यात आली आहे आणि सहा गोडाऊन्सना टाळं ठोकण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2012 10:04 AM IST

ठाण्यात जकात एजंटच्या संपामुळे ट्रॅफिक जाम

16 मे

ठाण्यातल्या आनंदनगर जकात नाक्यावर एजंटस्‌नी काम बंद केलं आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहनांच्या लांबच लांब लांब रांगा लागल्या आहेत परिणामी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम झालंआहे. काल मंगळवारी मुंबईतल्या सर्व जकात नाक्यांवर अँटी करप्शन विभागाने छापे टाकले होते. याप्रकरणी गैरव्यवहार करणार्‍या 12 जणांना अँटी करप्शनच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेवून पालिकेच्या जकात दक्षता विभागाकडे सुपूर्द केलंय. अँटी करप्शनच्या या कारवाईचा निषेध करत एजंटस्‌नी कामबंद केलं आहे.

दरम्यान कालच्या कारवाईत 12 जकात अधिकार्‍यांना अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतलं आहे. यामध्ये सुपरीटेडंट आणि जकात इन्सपेक्टरचा समावेश आहे. तर 50 पेक्षा जास्त जकात एजंटना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्वांची चौकशी सुरु आहे. तर या कारवाई दरम्यान, 50 वाहने जप्त करण्यात आली आहे आणि सहा गोडाऊन्सना टाळं ठोकण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2012 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close