S M L

राज्यातील 6 आजारी मध्यवर्ती बँकांचा पाय खोलात

16 मेराज्यातील 6 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा परवाना धोक्यात आला आहे. यात उस्मानाबाद, वर्धा,धुळे-नंदुरबार,बुलढाणा,जालना आणि नागपूर जिल्हा बँकेचा समावेश आहे. या बँकाना नवीन ठेवी स्वीकारण्यास रिझर्व बँकेने बंदी घातल्याने गेल्या दिवसात जवळपास 40 कोटीच्या ठेवी ठेवीदारांनी बँकेतून काढून घेतल्याने अखेर या आजारी बँकांनी राज्य सरकारला मदत मागितली आहे. या बँकांना पुन्हा एकदा 31 मार्च 2013 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारने रिझर्व बँकेला करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या बँकातील ठेवी सुरक्षित असून ठेवीदारांनी चिंता करण्याचं कारण नाही असं आवाहन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. बँकांना सहकार्य करीत असतानांच या बँकांनी तातडीनं आपला एनपीए (NPA) नियंत्रणात आणावा नाही तर राज्य सरकार त्यांना पुन्हा मदत करणार नाही असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2012 10:44 AM IST

राज्यातील  6 आजारी मध्यवर्ती बँकांचा पाय खोलात

16 मे

राज्यातील 6 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा परवाना धोक्यात आला आहे. यात उस्मानाबाद, वर्धा,धुळे-नंदुरबार,बुलढाणा,जालना आणि नागपूर जिल्हा बँकेचा समावेश आहे. या बँकाना नवीन ठेवी स्वीकारण्यास रिझर्व बँकेने बंदी घातल्याने गेल्या दिवसात जवळपास 40 कोटीच्या ठेवी ठेवीदारांनी बँकेतून काढून घेतल्याने अखेर या आजारी बँकांनी राज्य सरकारला मदत मागितली आहे. या बँकांना पुन्हा एकदा 31 मार्च 2013 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारने रिझर्व बँकेला करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या बँकातील ठेवी सुरक्षित असून ठेवीदारांनी चिंता करण्याचं कारण नाही असं आवाहन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. बँकांना सहकार्य करीत असतानांच या बँकांनी तातडीनं आपला एनपीए (NPA) नियंत्रणात आणावा नाही तर राज्य सरकार त्यांना पुन्हा मदत करणार नाही असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2012 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close