S M L

आज मुंबई-कोलकातामध्ये 'काटे की टक्कर'

16 मेआयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्ससमोर आव्हान आहे ते कोलकाता नाईट रायडर्सचं. गेल्या मॅचमध्ये बलाढ्य बंगलोर रॉयलचा पराभव करत मुंबईने प्ले ऑफमधलं आपलं आव्हान कायम ठेवलंय. मुंबईचे 14 मॅचमध्ये 18 पॉईंट झालेत आणि कोलकाताविरुध्दची मॅच जिंकत आपलं स्थान भक्कम करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. त्यातच गेल्या काही मॅचमध्ये सचिन तेंडुलकरलाही मोठा स्कोर करता आलेला नाही. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला प्ले ऑफ गाठण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. कोलकाताचे 14 मॅचमध्ये 17 पॉईंट झाले आहेत. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीमची कामगिरी चांगली होत असली तरी गेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांना पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे विजयाच्या मार्गावर येण्यासाठी कोलकाताला ही मॅच जिंकावीच लागणार आहे. पण मॅच मुंबईच्या घरच्या मैदानावर असल्यानं कोलकाता हे आव्हान सोप नसणार हे नक्की..

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2012 11:23 AM IST

आज मुंबई-कोलकातामध्ये 'काटे की टक्कर'

16 मे

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्ससमोर आव्हान आहे ते कोलकाता नाईट रायडर्सचं. गेल्या मॅचमध्ये बलाढ्य बंगलोर रॉयलचा पराभव करत मुंबईने प्ले ऑफमधलं आपलं आव्हान कायम ठेवलंय. मुंबईचे 14 मॅचमध्ये 18 पॉईंट झालेत आणि कोलकाताविरुध्दची मॅच जिंकत आपलं स्थान भक्कम करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. त्यातच गेल्या काही मॅचमध्ये सचिन तेंडुलकरलाही मोठा स्कोर करता आलेला नाही. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला प्ले ऑफ गाठण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. कोलकाताचे 14 मॅचमध्ये 17 पॉईंट झाले आहेत. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीमची कामगिरी चांगली होत असली तरी गेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांना पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे विजयाच्या मार्गावर येण्यासाठी कोलकाताला ही मॅच जिंकावीच लागणार आहे. पण मॅच मुंबईच्या घरच्या मैदानावर असल्यानं कोलकाता हे आव्हान सोप नसणार हे नक्की..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2012 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close