S M L

हल्ल्यामागे काँग्रेसचं षडयंत्र - अण्णा हजारे

17 मेकाल संध्याकाळी नागपूरमध्ये आपल्या ताफ्यातील गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे काँग्रेसचं षडयंत्र आहे. त्यांना येत्या निवडणुकीत आपला पराभव दिसत असल्यामुळे नेतृत्व अस्थिर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे असा आरोप जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केला. आज अण्णा हजारे वर्ध्यात दाखल झाले आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलतं होते. काल बुधवारी संध्याकाळी नागपूर येथील चिटणीस पार्क येथे अण्णांच्या ताफ्यातील गाडीवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बदनामी करणारी पुस्तकं वाटल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. आज या प्रकरणी दोन कार्यकर्त्यांनी अटक करण्यात आली आणि काही वेळांने सोडुन देण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 10:00 AM IST

हल्ल्यामागे काँग्रेसचं षडयंत्र - अण्णा हजारे

17 मे

काल संध्याकाळी नागपूरमध्ये आपल्या ताफ्यातील गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे काँग्रेसचं षडयंत्र आहे. त्यांना येत्या निवडणुकीत आपला पराभव दिसत असल्यामुळे नेतृत्व अस्थिर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे असा आरोप जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केला. आज अण्णा हजारे वर्ध्यात दाखल झाले आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलतं होते. काल बुधवारी संध्याकाळी नागपूर येथील चिटणीस पार्क येथे अण्णांच्या ताफ्यातील गाडीवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बदनामी करणारी पुस्तकं वाटल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. आज या प्रकरणी दोन कार्यकर्त्यांनी अटक करण्यात आली आणि काही वेळांने सोडुन देण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close