S M L

'लोकपाल'चा नवा मसुदा 21 मे रोजी राज्यसभेत

17 मेबहुचर्चित बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयक येत्या 21 मे रोजी राज्यसभेत मांडलं जाणर आहे. लोकपाल विधेयकात सरकारने काही बदल केले आहेत. हे सुधारीत विधेयक आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मांडलं जाणार आहे. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब केलं जाईल आणि 21 मे रोजी ते राज्यसभेत मांडलं जाईल. लगेचच दुसर्‍याच दिवशी म्हणजे 22 मे रोजी बजेट अधिवेशनाची सांगता होतेय. त्यामुळे लोकपाल राज्यसभेत सादर करण्याची फक्त औपचारिकता पूर्ण होणार आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच याही अधिवेशनात लोकपालचं भवितव्य अधांतरीच राहणार असं दिसतंय. सुधारीत मसुद्यात लोकायुक्ताचा अधिकार राज्य सरकारकडे सोपवण्यात आला आहे. आणि 100 खासदारांनी तक्रार केल्यानंतरच लोकपाल हटवण्याची तरतूद करण्यात आल्याचं समजतं. लोकपालची नियुक्ती आणि सीबीआयच्या मुद्द्यावर अजून तोडगा निघालेला नाही आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 01:13 PM IST

'लोकपाल'चा नवा मसुदा 21 मे रोजी राज्यसभेत

17 मे

बहुचर्चित बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयक येत्या 21 मे रोजी राज्यसभेत मांडलं जाणर आहे. लोकपाल विधेयकात सरकारने काही बदल केले आहेत. हे सुधारीत विधेयक आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मांडलं जाणार आहे. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब केलं जाईल आणि 21 मे रोजी ते राज्यसभेत मांडलं जाईल. लगेचच दुसर्‍याच दिवशी म्हणजे 22 मे रोजी बजेट अधिवेशनाची सांगता होतेय. त्यामुळे लोकपाल राज्यसभेत सादर करण्याची फक्त औपचारिकता पूर्ण होणार आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच याही अधिवेशनात लोकपालचं भवितव्य अधांतरीच राहणार असं दिसतंय. सुधारीत मसुद्यात लोकायुक्ताचा अधिकार राज्य सरकारकडे सोपवण्यात आला आहे. आणि 100 खासदारांनी तक्रार केल्यानंतरच लोकपाल हटवण्याची तरतूद करण्यात आल्याचं समजतं. लोकपालची नियुक्ती आणि सीबीआयच्या मुद्द्यावर अजून तोडगा निघालेला नाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close