S M L

ल्यूक पॉमरबॅशला उद्यापर्यंत जामीन

18 मेआयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा खेळाडू ल्यूक पॉमरबॅश याला एका अमेरिकनं महिलेची छेडछाड काढल्या प्रकरणी उद्यापर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे. गुरुवारी झालेल्या मॅचनंतर दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेल मौर्यामध्ये ल्यूकने एका अमेरिकनं महिलेची छेड काढली. तिच्या बेडरुममध्ये जाऊन तिच्याशी जबरदस्ती केली यावेळी ल्यूकने तिच्या प्रियकराला मारहाण केली असा आरोप त्यामहिलेनं केला आहे. याबद्दल सदरील महिलेनं चाणक्यपुरी पोलिस स्टेशमध्ये ल्युक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ल्यूक पॉमरबॅश हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. ल्यूकच्या या वर्तनामुळे त्याला टीममधून वगळण्यात आलं आहे. पण ल्यूक पॉमरबॅशचं बंगलोरचा मालक सिद्धार्थ माल्ल्यानं ट्विटरवरुन समर्थन केलं आहे. 'ल्यूकवर आपल्या भावी पतीला मारहाणीचा आरोप करणारी मुलगी काल रात्री माझ्यासोबतच होती. जर तो तिचा भावी पती आहे, तर मग तिची वर्तवणूक भावी पत्नीसारखी नव्हती. ही मुलगी जे करतेय ते मूर्खपणाचं आहे.' असं सिद्धार्थनं म्हटलंय. तर ही पार्टी आयपीएलने आयोजित केली नव्हती, त्यामुळे तिथं काय घडलं याची जबाबदारी आयपीएलची नाही असं अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 10:03 AM IST

ल्यूक पॉमरबॅशला उद्यापर्यंत जामीन

18 मे

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा खेळाडू ल्यूक पॉमरबॅश याला एका अमेरिकनं महिलेची छेडछाड काढल्या प्रकरणी उद्यापर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे. गुरुवारी झालेल्या मॅचनंतर दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेल मौर्यामध्ये ल्यूकने एका अमेरिकनं महिलेची छेड काढली. तिच्या बेडरुममध्ये जाऊन तिच्याशी जबरदस्ती केली यावेळी ल्यूकने तिच्या प्रियकराला मारहाण केली असा आरोप त्यामहिलेनं केला आहे. याबद्दल सदरील महिलेनं चाणक्यपुरी पोलिस स्टेशमध्ये ल्युक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ल्यूक पॉमरबॅश हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. ल्यूकच्या या वर्तनामुळे त्याला टीममधून वगळण्यात आलं आहे. पण ल्यूक पॉमरबॅशचं बंगलोरचा मालक सिद्धार्थ माल्ल्यानं ट्विटरवरुन समर्थन केलं आहे. 'ल्यूकवर आपल्या भावी पतीला मारहाणीचा आरोप करणारी मुलगी काल रात्री माझ्यासोबतच होती. जर तो तिचा भावी पती आहे, तर मग तिची वर्तवणूक भावी पत्नीसारखी नव्हती. ही मुलगी जे करतेय ते मूर्खपणाचं आहे.' असं सिद्धार्थनं म्हटलंय. तर ही पार्टी आयपीएलने आयोजित केली नव्हती, त्यामुळे तिथं काय घडलं याची जबाबदारी आयपीएलची नाही असं अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close