S M L

दुष्काळाला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या

18 मेराज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करत आहे. सांगली जिल्ह्यातल्या मुचंडी गावात एका शेतमजुराने गळफास लावून आत्महत्या केली आहे. बाबुराव जत्ती असं त्याचं नाव आहे. मुचंडी गाव दुष्काळग्रस्त आहे. गावात पाणी नाही आणि चाराही नाही. पाणी नसल्यामुळे शेतीची कामंही बंद आहे. रोजगार हमी योजनेची कामंही सध्या बंद आहेत. त्यामुळे बाबुरावकडे उपजीविकेसाठी कुठलंच काम नव्हतं. या नैराश्यातून त्यानं आत्महत्या केली. बाबूरावच्या मागे त्याची पत्नी आणि तीन मुलं आहेत. दुष्काळामुळे बाबुराव जत्तीवर आत्महत्या करण्याची वेळ आली त्यामुळे शासनाने त्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 02:13 PM IST

दुष्काळाला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या

18 मे

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करत आहे. सांगली जिल्ह्यातल्या मुचंडी गावात एका शेतमजुराने गळफास लावून आत्महत्या केली आहे. बाबुराव जत्ती असं त्याचं नाव आहे. मुचंडी गाव दुष्काळग्रस्त आहे. गावात पाणी नाही आणि चाराही नाही. पाणी नसल्यामुळे शेतीची कामंही बंद आहे. रोजगार हमी योजनेची कामंही सध्या बंद आहेत. त्यामुळे बाबुरावकडे उपजीविकेसाठी कुठलंच काम नव्हतं. या नैराश्यातून त्यानं आत्महत्या केली. बाबूरावच्या मागे त्याची पत्नी आणि तीन मुलं आहेत. दुष्काळामुळे बाबुराव जत्तीवर आत्महत्या करण्याची वेळ आली त्यामुळे शासनाने त्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close