S M L

मेरी कॉमनं पटकावलं ऑलिम्पिकचं तिकीट

18 मेभारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कॉमनं लंडन ऑलिम्पिकचं तिकीट पटकावलं आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खरं तर क्वार्टरफायनलमध्ये मेरी कॉमचा पराभव झाला होता. पण तिला नमवणार्‍या वर्ल्ड नंबर 2 निकोला ऍडम्सने सेमी फायनलची मॅच जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मेरी कॉमचं लंडन ऑलिम्पिकचं तिकीट पक्क झालं आहे. मेरी कॉम 51 किलो वजनी गटात लढणार आहे. ऑलिम्पिक खेळणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. येत्या 27 जुलैपासून लंडन ऑलिम्पिक सुरू होत आहे. बॉक्सिंगमध्ये जगजेतेपद पटकावणारी मेरी कोम पहिली भारतीय महिला ठरली होती. तीच्याकडून या ऑलिम्पिकमध्ये मेडलच्या अपेक्षा आता आणखी वाढल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 03:29 PM IST

मेरी कॉमनं पटकावलं ऑलिम्पिकचं तिकीट

18 मे

भारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कॉमनं लंडन ऑलिम्पिकचं तिकीट पटकावलं आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खरं तर क्वार्टरफायनलमध्ये मेरी कॉमचा पराभव झाला होता. पण तिला नमवणार्‍या वर्ल्ड नंबर 2 निकोला ऍडम्सने सेमी फायनलची मॅच जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मेरी कॉमचं लंडन ऑलिम्पिकचं तिकीट पक्क झालं आहे. मेरी कॉम 51 किलो वजनी गटात लढणार आहे. ऑलिम्पिक खेळणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. येत्या 27 जुलैपासून लंडन ऑलिम्पिक सुरू होत आहे. बॉक्सिंगमध्ये जगजेतेपद पटकावणारी मेरी कोम पहिली भारतीय महिला ठरली होती. तीच्याकडून या ऑलिम्पिकमध्ये मेडलच्या अपेक्षा आता आणखी वाढल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close