S M L

अखेर 'कोट्यावधीचं' फेसबुक 'शेअर'बाजारात

18 मेप्रत्येकांच्या जिव्हाळ्याचं आणि दैनदिन जीवनाचा एक भाग बनलेल्या फेसबुकने आज उत्तुंग भरारी घेतली आहे. फेसबुकसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा होता. आठ वर्षांपूर्वी होस्टेलच्या एका खोलीत सुरु झालेल्या या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा आज आयपीओ (IPO) बाजारात आला आहे. गेल्या अनेक वर्षात कोणत्याही आयपीओची जितकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा फेसबुकच्या आयपीओची होतेय. या आयपीओची किंमत जवळपास 104 बिलियन डॉलर्स इतकी आहे. नॅसडॅकमध्ये फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्गने बेल वाजवत अधिकृतपणे हा आयपीओ बाजारात आणला आहे. पण इतक्या लवकर फेसबुकच्या स्टॉक्सवर ट्रेडिंग होणार नसल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 04:25 PM IST

अखेर 'कोट्यावधीचं' फेसबुक 'शेअर'बाजारात

18 मे

प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचं आणि दैनदिन जीवनाचा एक भाग बनलेल्या फेसबुकने आज उत्तुंग भरारी घेतली आहे. फेसबुकसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा होता. आठ वर्षांपूर्वी होस्टेलच्या एका खोलीत सुरु झालेल्या या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा आज आयपीओ (IPO) बाजारात आला आहे. गेल्या अनेक वर्षात कोणत्याही आयपीओची जितकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा फेसबुकच्या आयपीओची होतेय. या आयपीओची किंमत जवळपास 104 बिलियन डॉलर्स इतकी आहे. नॅसडॅकमध्ये फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्गने बेल वाजवत अधिकृतपणे हा आयपीओ बाजारात आणला आहे. पण इतक्या लवकर फेसबुकच्या स्टॉक्सवर ट्रेडिंग होणार नसल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close