S M L

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाश मोहाडीकर यांचं निधन

19 मेज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाश मोहाडीकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. उद्या दादरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दादरमधल्या सानेगुरुजी विद्यालयात उद्या सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. प्रकाश मोहाडीकर यांनी नेत्रदान केलंय.मोहाडीकर हे सानेगुरुजींचे सच्चे अनुयायी होते. सानेगुरूजींच्या मृत्यूनंतर अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालाची स्थापना त्यांनी केली. सानेगुरूंजीचे विचार या माध्यमातून गेली 60 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी पोहचवले. सानेगुरुजींचं साहित्य नव्या पीढीसमोर आणलं. प्रकाश मोहाडीकर यांनी अमरहिंद मंडळाचीही स्थापना केली. वसंत व्याख्यानमाला मोहाडीकरांनी अव्याहतपणे सुरू ठेवली. कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन, पनवेल या ठिकाणी विद्यार्थी शिबिराच्या माध्यमातून प्रकाश मोहाडकर यांनी अनेक चांगले उपक्रम राबवले. 1967 मध्ये शिक्षक मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी शिक्षकांसाठी भरीव काम त्यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2012 09:30 AM IST

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाश मोहाडीकर यांचं निधन

19 मे

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाश मोहाडीकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. उद्या दादरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दादरमधल्या सानेगुरुजी विद्यालयात उद्या सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. प्रकाश मोहाडीकर यांनी नेत्रदान केलंय.मोहाडीकर हे सानेगुरुजींचे सच्चे अनुयायी होते. सानेगुरूजींच्या मृत्यूनंतर अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालाची स्थापना त्यांनी केली. सानेगुरूंजीचे विचार या माध्यमातून गेली 60 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी पोहचवले. सानेगुरुजींचं साहित्य नव्या पीढीसमोर आणलं. प्रकाश मोहाडीकर यांनी अमरहिंद मंडळाचीही स्थापना केली. वसंत व्याख्यानमाला मोहाडीकरांनी अव्याहतपणे सुरू ठेवली. कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन, पनवेल या ठिकाणी विद्यार्थी शिबिराच्या माध्यमातून प्रकाश मोहाडकर यांनी अनेक चांगले उपक्रम राबवले. 1967 मध्ये शिक्षक मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी शिक्षकांसाठी भरीव काम त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2012 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close