S M L

घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी

19 मेजळगावच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी 25 आजी माजी नगरसेवकांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यात 3 माजी नगराध्यक्षांचा समावेश आहे. त्यातील 11 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 आजी माजी नगरसेवकांना आज अटक करण्यात आली होती. जळगावातल्या 29 कोटींच्या घरकुल घोटाळ्यात 98 आरोपी आहेत. यात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचाही समावेश आहे. या घोटाळा प्रकरणात गुलाबराव देवकर यांनाही पोलिसांनी स्टेशनमध्ये बोलावलं आहे. पण अजूनही देवकर यांनी स्टेशनला हजेरी लावले नाही. घरकुल घोटाळा प्रकरणी आज पोलिसांनी 48 आजी, माजी नगरसेवकांना नोटीस बजावली होती. यात पालकमंत्री गुलाबराव देवकार यांचाही समावेश आहे. देवकर हे त्यावेळी जळगावचे नगराध्यक्ष होते. दरम्यान या नगरसेवकांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2012 11:06 AM IST

घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी

19 मे

जळगावच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी 25 आजी माजी नगरसेवकांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यात 3 माजी नगराध्यक्षांचा समावेश आहे. त्यातील 11 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 आजी माजी नगरसेवकांना आज अटक करण्यात आली होती. जळगावातल्या 29 कोटींच्या घरकुल घोटाळ्यात 98 आरोपी आहेत. यात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचाही समावेश आहे. या घोटाळा प्रकरणात गुलाबराव देवकर यांनाही पोलिसांनी स्टेशनमध्ये बोलावलं आहे. पण अजूनही देवकर यांनी स्टेशनला हजेरी लावले नाही. घरकुल घोटाळा प्रकरणी आज पोलिसांनी 48 आजी, माजी नगरसेवकांना नोटीस बजावली होती. यात पालकमंत्री गुलाबराव देवकार यांचाही समावेश आहे. देवकर हे त्यावेळी जळगावचे नगराध्यक्ष होते. दरम्यान या नगरसेवकांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2012 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close