S M L

सी लिंकवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

19 मेमुंबईतील वरळी सी लिंकवरुन एका विवाहित महिलेनं समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जलपा पुजारी असं या महिलेचं नाव आहे. पण ऐन वेळी पोलीस कॉन्सटेबल गुणाजी पाटील यांनी धाव घेऊन या महिलेचा जीव वाचवला. या महिलेला पोद्दार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.आज दुपारी तिनच्या सुमारास सी लिंकवर हे सगळे नाट्य घडले. ही महिला टॅक्सीतून बांद्राकडे निघाली होती .पण या महिलेने टॅक्सी ड्रायव्हरला वरळी सी लिंकवर थांबायला सांगितलं. पण लिंकवर टॅक्सी मध्येच थांबवता येणार नाही असं ड्रायव्हरने सांगितल्यावर आपसी पर्स पडली असं कारण सांगून या महिलेने जबरदस्ती टॅक्सी थांबवून वरळी सी लींकवरून समुद्रात उडी घेतली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे टॅक्सी चालकांना मदतीसाठी हाक दिली. यावेळी गस्त घालणार्‍या पोलीस कॉन्सटेबल गुणाजी पाटील यांनी धाव घेतली. गुणाजी यांनी समुद्रात उडी मारली त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या दोन सहकार्‍यांनी उडी मारली आणि महिलेचा जीव वाचवला. जलपा पुजारी या महिलेला किरकोळ जखमा झाल्या आहेत तिला पोद्दार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे मात्र अजून कळू शकले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2012 12:16 PM IST

सी लिंकवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

19 मेमुंबईतील वरळी सी लिंकवरुन एका विवाहित महिलेनं समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जलपा पुजारी असं या महिलेचं नाव आहे. पण ऐन वेळी पोलीस कॉन्सटेबल गुणाजी पाटील यांनी धाव घेऊन या महिलेचा जीव वाचवला. या महिलेला पोद्दार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आज दुपारी तिनच्या सुमारास सी लिंकवर हे सगळे नाट्य घडले. ही महिला टॅक्सीतून बांद्राकडे निघाली होती .पण या महिलेने टॅक्सी ड्रायव्हरला वरळी सी लिंकवर थांबायला सांगितलं. पण लिंकवर टॅक्सी मध्येच थांबवता येणार नाही असं ड्रायव्हरने सांगितल्यावर आपसी पर्स पडली असं कारण सांगून या महिलेने जबरदस्ती टॅक्सी थांबवून वरळी सी लींकवरून समुद्रात उडी घेतली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे टॅक्सी चालकांना मदतीसाठी हाक दिली. यावेळी गस्त घालणार्‍या पोलीस कॉन्सटेबल गुणाजी पाटील यांनी धाव घेतली. गुणाजी यांनी समुद्रात उडी मारली त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या दोन सहकार्‍यांनी उडी मारली आणि महिलेचा जीव वाचवला. जलपा पुजारी या महिलेला किरकोळ जखमा झाल्या आहेत तिला पोद्दार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे मात्र अजून कळू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2012 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close