S M L

शिव वडापाव केंद्रासाठी मुंबई महापालिकेच्या जागा

25 नोव्हेंबर, मुंबईविनोद तळेकरझुणका भाकर केंद्रानंतर शिवसेना आता शिव वडापाव केंद्र उभारणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या जागा देण्यात येणार आहेत. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय तर महापालिकेच्या मालकीच्या जागा आपल्या कार्यकर्त्यांना फुकटात मिळाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे.शिव वडापाव विक्रेत्यांना 100 स्क्वेअर फूट जागा त्यांच्या दुकानासाठी दिल्या जातील. शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. म्युनिसिपल कमिशनरांनीही त्या मान्यता दिली आहे. मात्र विरोधी पक्षांनी या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट सारख्या भागात कमर्शियल जागेचा भाव 25 हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका आहे. यापूर्वी झुणका भाकर केंद्राच्या नावानं ज्या जागा वाटल्या गेल्या त्यात शिवसेनेच्या नेत्यांचे नातेवाईक, पदाधिकारी यांचा समावेश होता. प्रत्यक्षात या जागा नंतर अमराठींच्याच ताब्यात गेल्या. आता पुन्हा कोट्यवधी रुपयांच्या जागा फुकटात आपल्या कार्यकर्त्यांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. "शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे मोक्याच्या जागा हडपण्याचा डाव आहे. पण आम्ही या निर्णयाला विरोध करू. हा निर्णय होऊ देणार नाही." असं काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी स्पष्ट केलं.शिवसेनेनं मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. "शिवसेनेने कायम सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत. विरोधक काय वाटेल ते बोलतात. पण जर का या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या फायदा होणार असेल तर त्यात चुकीचं काय ?" असा सवाल शिवसेना प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी केला.महापालिकेत असलेल्या सत्तेच्या बळावर शिवसेनेने हा निर्णय तर घेतलाय पण आता याच्या अंतिम मंजुरीसीठी त्यांना राज्य शासनाचा दरवाजा ठोठवावा लागणारआहे. त्यामुळे त्यावेळी राज्य सरकार आणि शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगणार आहे.युतीच्या राज्यात सुरू केलेली झुणका भाकर योजना आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि अयोग्य अंमलबजावणीमुळे बंद केली. हा इतिहास ताजा असतानाच शिवसेनेने आता हा नवा निर्णय घेऊन पुन्हा एकदा नवा वाद उभा केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 04:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 04:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close