S M L

कल्याणमध्ये उमेदवारांकडून शाळेची तोडफोड

19 मेकल्याणमध्ये कल्याणी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची 19 पदं भरली जाणार होती. त्याच्या मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनी तिथल्या सामानांची तोडफोड केलीय. 19 जागांसाठी राज्यभरातून 550 उमेदवार इथं मुलाखतीसाठी आले होते. काल रात्रीपासूनच संस्थेच्या कल्याणमधील कर्णिकनगर भागातल्या कार्यालयाजवळ हजर होते. परंतु, मुलाखतीपूर्वीच या जागा आर्थिक व्यवहारातून ही पदं भरली गेल्याचा आरोप मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी तिथल्या सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी संस्थाचालक दिलीप पाटील यांना ताब्यातही घेतलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2012 01:04 PM IST

कल्याणमध्ये उमेदवारांकडून शाळेची तोडफोड

19 मे

कल्याणमध्ये कल्याणी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची 19 पदं भरली जाणार होती. त्याच्या मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनी तिथल्या सामानांची तोडफोड केलीय. 19 जागांसाठी राज्यभरातून 550 उमेदवार इथं मुलाखतीसाठी आले होते. काल रात्रीपासूनच संस्थेच्या कल्याणमधील कर्णिकनगर भागातल्या कार्यालयाजवळ हजर होते. परंतु, मुलाखतीपूर्वीच या जागा आर्थिक व्यवहारातून ही पदं भरली गेल्याचा आरोप मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी तिथल्या सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी संस्थाचालक दिलीप पाटील यांना ताब्यातही घेतलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2012 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close