S M L

आईनेच घोटला मुलींची गळा

18 मेनऊ महिने गर्भात वाढ करुन जगात दाखल झालेल्या कवळा जीव मुलगी आहे म्हणून तीच्या आईनेच गळा गोठण्याचा प्रकार बीडमध्ये घडला. तर दुसर्‍या घटनेत चार मुली पाठीवर आहे म्हणून गर्भपात करण्यासाठी गेलेला मातेचा गर्भपात करत असताना तीचा दुदैर्वी मृत्यू झाला. माणुसकीला काळीमा फासणार हा प्रकार पाहुन समाज मन सुन्न झाले आहे. आजच्या युगात मुलगा हवाच या हट्टापोटी एका मातेला आणि एका नवजात मुलीला या जगाचा निरोप घ्यावा लागल्याची दुदैर्वी घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडल्यात.बीड जिल्हातील शिरुर तालुक्यात सुशीला रिटवट्टीवार या मातेनं दोन दिवसांपुर्वी जन्मदिलेल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि तिचं प्रेत रस्त्याच्या बाजूला पुरण्याचा प्रयत्न केला. लोकांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावले आणि हा प्रकार उघडकीस आला. बीड पोलिसांनी या महिलेच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. पण मुलीची हत्या का केली याच उत्तर अजून या महिलेनं दिलं नाही. तर दुसर्‍या घटनेत परळीत शुक्रवारी रात्री गर्भपात करत असताना एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला अगोदर चार मुली होत्या. पाचवीही मुलगी असल्याचं गर्भलिंगनिदानातून स्पष्ट झाल्यामुळे घरच्यांनी गर्भपात करण्यासाठी महिलेला परळी इथं डॉ. सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी सिझेरियन करून गर्भपात केला. गर्भपात करताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये महिलेचा गर्भपात झाल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी कलम 304 अंतर्गत परळी पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि डॉ. सुदाम मुंडे यांना अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद बीडमध्ये उमटले. डॉ. मुंडेंविरूध्द 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. डॉ. मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या हॉस्पिटलविरोधात यापूर्वी स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात 3 गुन्हे दाखल आहेत. तरीही प्रशासन आणि पोलीस या हॉस्पिटलविरोधात कुठलीही कारवाई करत नाहीत, असा आरोप सामाजिक संघटना आणि परिसरातल्या लोकांकडून होतोय. या अगोदरही बीडमध्ये एका नाल्यात मुलींची अर्भक सापडण्याची धक्कादायक घडला होती. या घटनामुळे पुन्हा एकदा बीड प्रकाशझोतात आले. पण मुलाच्या हट्टासाठी अजून किती मुलींची हत्या करणार ? याचे उत्तर शोधण्यापेक्षा स्वत:पासून बदलाची सुरुवात करणं गरजेचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2012 02:31 PM IST

आईनेच घोटला मुलींची गळा

18 मे

नऊ महिने गर्भात वाढ करुन जगात दाखल झालेल्या कवळा जीव मुलगी आहे म्हणून तीच्या आईनेच गळा गोठण्याचा प्रकार बीडमध्ये घडला. तर दुसर्‍या घटनेत चार मुली पाठीवर आहे म्हणून गर्भपात करण्यासाठी गेलेला मातेचा गर्भपात करत असताना तीचा दुदैर्वी मृत्यू झाला. माणुसकीला काळीमा फासणार हा प्रकार पाहुन समाज मन सुन्न झाले आहे. आजच्या युगात मुलगा हवाच या हट्टापोटी एका मातेला आणि एका नवजात मुलीला या जगाचा निरोप घ्यावा लागल्याची दुदैर्वी घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडल्यात.

बीड जिल्हातील शिरुर तालुक्यात सुशीला रिटवट्टीवार या मातेनं दोन दिवसांपुर्वी जन्मदिलेल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि तिचं प्रेत रस्त्याच्या बाजूला पुरण्याचा प्रयत्न केला. लोकांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावले आणि हा प्रकार उघडकीस आला. बीड पोलिसांनी या महिलेच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. पण मुलीची हत्या का केली याच उत्तर अजून या महिलेनं दिलं नाही. तर दुसर्‍या घटनेत परळीत शुक्रवारी रात्री गर्भपात करत असताना एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला अगोदर चार मुली होत्या. पाचवीही मुलगी असल्याचं गर्भलिंगनिदानातून स्पष्ट झाल्यामुळे घरच्यांनी गर्भपात करण्यासाठी महिलेला परळी इथं डॉ. सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी सिझेरियन करून गर्भपात केला.

गर्भपात करताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये महिलेचा गर्भपात झाल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी कलम 304 अंतर्गत परळी पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि डॉ. सुदाम मुंडे यांना अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद बीडमध्ये उमटले. डॉ. मुंडेंविरूध्द 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. डॉ. मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या हॉस्पिटलविरोधात यापूर्वी स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात 3 गुन्हे दाखल आहेत. तरीही प्रशासन आणि पोलीस या हॉस्पिटलविरोधात कुठलीही कारवाई करत नाहीत, असा आरोप सामाजिक संघटना आणि परिसरातल्या लोकांकडून होतोय. या अगोदरही बीडमध्ये एका नाल्यात मुलींची अर्भक सापडण्याची धक्कादायक घडला होती. या घटनामुळे पुन्हा एकदा बीड प्रकाशझोतात आले. पण मुलाच्या हट्टासाठी अजून किती मुलींची हत्या करणार ? याचे उत्तर शोधण्यापेक्षा स्वत:पासून बदलाची सुरुवात करणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2012 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close