S M L

'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' प्रेक्षकांच्या भेटीला

21 मेप्रसिद्ध सिने अभिनेता नंदु माधव यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेलं आणि राजकुमार तांगडे लिखीत एक आगळं वेगळं नाटक 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' काल प्रेक्षकांच्या भेटीला आलं. शिवाजी महाराजांचं 350 वर्षापुर्वीचं एक ऐतिहासिक पर्व त्याचबरोबर राज्यकारभारातली धोरणं मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकातून केला आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सर्वधर्मसमभावावर कसा चालला होता याचं एक मार्मिक चित्रण करण्यात आलंय. या कथेला जोड आहे ती संभाजी भगत यांच्या शाहिरीची...साचेबध्द मांडणी बरोबरच शाहिरीनं नाटकात एक वेगळीच रंगत आणली आहे.नाटक पहाताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारा येतो इतकं नक्की ..नंदु जाधव यांनी रंगभूमीवर केलेल्या या वेगळ्या प्रयत्नाला रसिक प्रेक्षकांनीही तितकीच उत्तम दाद दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2012 10:36 AM IST

'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' प्रेक्षकांच्या भेटीला

21 मे

प्रसिद्ध सिने अभिनेता नंदु माधव यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेलं आणि राजकुमार तांगडे लिखीत एक आगळं वेगळं नाटक 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' काल प्रेक्षकांच्या भेटीला आलं. शिवाजी महाराजांचं 350 वर्षापुर्वीचं एक ऐतिहासिक पर्व त्याचबरोबर राज्यकारभारातली धोरणं मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकातून केला आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सर्वधर्मसमभावावर कसा चालला होता याचं एक मार्मिक चित्रण करण्यात आलंय. या कथेला जोड आहे ती संभाजी भगत यांच्या शाहिरीची...साचेबध्द मांडणी बरोबरच शाहिरीनं नाटकात एक वेगळीच रंगत आणली आहे.नाटक पहाताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारा येतो इतकं नक्की ..नंदु जाधव यांनी रंगभूमीवर केलेल्या या वेगळ्या प्रयत्नाला रसिक प्रेक्षकांनीही तितकीच उत्तम दाद दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2012 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close