S M L

अखेर काळ्या पैशाबाबत सरकारने मांडली श्वेतपत्रिका

21 मेअखेर विरोधकांच्या मागणीवर सरकारने काळ्या पैशाबाबत लोकसभेत आज श्वेतपत्रिका मांडली. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ही श्वेतपत्रिका मांडली. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी आता आयकर विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. तसेच मालमत्ता विक्रीसाठी टीडीएस (TDS) प्रमाणपत्रही आता बंधनकारक असेल. तसेच मालमत्तेबाबत पाच टक्के नोंदणी करही भरावा लागेल असं सुचवण्यात आलं आहे. तसेच 5 लाखांच्यावरील सोनं खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव आहे. त्याचबरोबर स्वीस बँकेत असलेल्या काळ्या पैशाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती या श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2012 01:05 PM IST

अखेर काळ्या पैशाबाबत सरकारने मांडली श्वेतपत्रिका

21 मे

अखेर विरोधकांच्या मागणीवर सरकारने काळ्या पैशाबाबत लोकसभेत आज श्वेतपत्रिका मांडली. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ही श्वेतपत्रिका मांडली. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी आता आयकर विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. तसेच मालमत्ता विक्रीसाठी टीडीएस (TDS) प्रमाणपत्रही आता बंधनकारक असेल. तसेच मालमत्तेबाबत पाच टक्के नोंदणी करही भरावा लागेल असं सुचवण्यात आलं आहे. तसेच 5 लाखांच्यावरील सोनं खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव आहे. त्याचबरोबर स्वीस बँकेत असलेल्या काळ्या पैशाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती या श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2012 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close