S M L

'पेट्रोल बॉम्ब' फुटला, 7.50 रुपयानी पेट्रोल महागले

23 मेभारतीय पेट्रोल दरवाढीच्या इतिहासात आजपर्यंत कधी न झालेली 'महा'दरवाढ करण्याचा पराक्रम यूपीए सरकारने करुन दाखवला आहे. पेट्रोलच्या दरात 7 रुपये 50 पैशांची सर्वात मोठी दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर 6 रुपये 28 पैशांनी वाढवले आहे. त्यावर लोकल सेल्स टॅक्स किंवा व्हॅट आकारल्यानंतर पेट्रोलची दरवाढ 7 रुपये 50 पैशांपर्यंत जाते. आजपर्यंतच्या इतिहास इतक्या मोठ्याप्रमाणावर दरवाढ होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आणि पेट्रोल कंपन्यांना पोहचत असलेला तोटा यामुळे अखेर सरकारने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलची ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. मात्र, या दरवाढीवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. ममतांनीही दरवाढीचा निषेध केला आहे. विरोधक भडकलेआंतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांची होणार घसरण अजून सुरुच आहे. आज रुपयाची किंमत 56 रुपयांवर आली आहे. आजपर्यंत रुपयांची कधी नव्हे इतकी घसरण झाल्यामुळे याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येणार असल्याचं स्पष्ट झालं. याचा पहिला फटका बसला तो पेट्रोल दरवाढीला. गेल्या पाच महिन्यापासून पेट्रोल दरवाढीचा निर्णय घेण्यास चालढकल सुरु होती. अखेर पेट्रोलच्या दरात 7 रुपये 50 पैशांनी दरवाढ करण्याच्या निर्णय सरकारने जाहीर करण्यात आला. आज याबाबत सरकारने मित्रपक्षांशी चर्चा केली. पेट्रोल दरवाढ करण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नव्हता असं स्पष्टीकरण सरकार देतं आहे. पण पेट्रोलच्या या ऐतिहासिक दरवाढीचा विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागणं, हे अन्यायकारक असल्याचं भाजपचं म्हणणंय. तर डाव्यांनी दरवाढीविरोधात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यूपीएचे मित्र पक्ष असलेल्या तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनीही दरवाढीचा निषेध केला आहे. एवढी मोठी दरवाढ करण्याआधी आपल्याला विश्वासातच घेतलं नव्हतं, असा आरोप तृणमूल आणि द्रमुकनं केला आहे. एकंदरीच यूपीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहे यानिमित्त ही जनतेला पेट्रोल दरवाढीची भेट दिला आहे.पेट्रोल दरवाढीचं 'गणित'आजपर्यंतच्या इतिहासतील ही सगळ्यात मोठी दरवाढ ठरली आहे. दररोज पेट्रोल कंपन्यांना 76 टक्के इंधन आयात करावे लागते. त्यामुळे सरकारी पेट्रोल कंपन्यांना दिवसाला 60 कोटींचा फटका सहन करावा लागतोय. याअगोदर पेट्रोल कंपन्यांनी 15 डिसेंबर 2011 ला 2 रुपये 80 पैशांची दरवाढ करण्याची मागणी सरकारकडे केली. मात्र पाच राज्यांच्या निवडणुका पाहता सरकारने दरवाढ पुढे ढकली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाची नीच्चांक किंमत गाठल्यामुळे पेट्रोल कंपन्यांचा पाय अजून खोलात गेला. या महिन्याच्या 3 मे रोजी पेट्रोल कंपन्यांनी 8 रुपये 86 पैशांची दरवाढ करण्याची मागणी केली मात्र तिही नाकारण्यात आली आणि अखेरीस सरकारने यातला मधला मार्ग पकडत 7 रुपये 50 पैशांवर शिक्कामोर्तब केला. आतापर्यंतचीही 13 वी दरवाढ ठरली आहे. पेट्रोल दरवाढीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार हे साहजिकच आहे. पण दररोज 60 कोटींचा फटका बसत असल्यामुळे जर दरवाढ केली नसती तर सरकारी चारही पेट्रोल कंपन्या डबघाईला निघण्याची शक्यता होती. मात्र, सरकारने एक रक्कमी इतक्या मोठ्याप्रमाणावर दरवाढ करुन जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2012 12:58 PM IST

'पेट्रोल बॉम्ब' फुटला, 7.50 रुपयानी पेट्रोल महागले

23 मे

भारतीय पेट्रोल दरवाढीच्या इतिहासात आजपर्यंत कधी न झालेली 'महा'दरवाढ करण्याचा पराक्रम यूपीए सरकारने करुन दाखवला आहे. पेट्रोलच्या दरात 7 रुपये 50 पैशांची सर्वात मोठी दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर 6 रुपये 28 पैशांनी वाढवले आहे. त्यावर लोकल सेल्स टॅक्स किंवा व्हॅट आकारल्यानंतर पेट्रोलची दरवाढ 7 रुपये 50 पैशांपर्यंत जाते. आजपर्यंतच्या इतिहास इतक्या मोठ्याप्रमाणावर दरवाढ होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आणि पेट्रोल कंपन्यांना पोहचत असलेला तोटा यामुळे अखेर सरकारने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलची ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. मात्र, या दरवाढीवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. ममतांनीही दरवाढीचा निषेध केला आहे.

विरोधक भडकले

आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांची होणार घसरण अजून सुरुच आहे. आज रुपयाची किंमत 56 रुपयांवर आली आहे. आजपर्यंत रुपयांची कधी नव्हे इतकी घसरण झाल्यामुळे याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येणार असल्याचं स्पष्ट झालं. याचा पहिला फटका बसला तो पेट्रोल दरवाढीला. गेल्या पाच महिन्यापासून पेट्रोल दरवाढीचा निर्णय घेण्यास चालढकल सुरु होती. अखेर पेट्रोलच्या दरात 7 रुपये 50 पैशांनी दरवाढ करण्याच्या निर्णय सरकारने जाहीर करण्यात आला. आज याबाबत सरकारने मित्रपक्षांशी चर्चा केली.

पेट्रोल दरवाढ करण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नव्हता असं स्पष्टीकरण सरकार देतं आहे. पण पेट्रोलच्या या ऐतिहासिक दरवाढीचा विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागणं, हे अन्यायकारक असल्याचं भाजपचं म्हणणंय. तर डाव्यांनी दरवाढीविरोधात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यूपीएचे मित्र पक्ष असलेल्या तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनीही दरवाढीचा निषेध केला आहे. एवढी मोठी दरवाढ करण्याआधी आपल्याला विश्वासातच घेतलं नव्हतं, असा आरोप तृणमूल आणि द्रमुकनं केला आहे. एकंदरीच यूपीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहे यानिमित्त ही जनतेला पेट्रोल दरवाढीची भेट दिला आहे.

पेट्रोल दरवाढीचं 'गणित'

आजपर्यंतच्या इतिहासतील ही सगळ्यात मोठी दरवाढ ठरली आहे. दररोज पेट्रोल कंपन्यांना 76 टक्के इंधन आयात करावे लागते. त्यामुळे सरकारी पेट्रोल कंपन्यांना दिवसाला 60 कोटींचा फटका सहन करावा लागतोय. याअगोदर पेट्रोल कंपन्यांनी 15 डिसेंबर 2011 ला 2 रुपये 80 पैशांची दरवाढ करण्याची मागणी सरकारकडे केली. मात्र पाच राज्यांच्या निवडणुका पाहता सरकारने दरवाढ पुढे ढकली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाची नीच्चांक किंमत गाठल्यामुळे पेट्रोल कंपन्यांचा पाय अजून खोलात गेला. या महिन्याच्या 3 मे रोजी पेट्रोल कंपन्यांनी 8 रुपये 86 पैशांची दरवाढ करण्याची मागणी केली मात्र तिही नाकारण्यात आली आणि अखेरीस सरकारने यातला मधला मार्ग पकडत 7 रुपये 50 पैशांवर शिक्कामोर्तब केला. आतापर्यंतचीही 13 वी दरवाढ ठरली आहे. पेट्रोल दरवाढीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार हे साहजिकच आहे. पण दररोज 60 कोटींचा फटका बसत असल्यामुळे जर दरवाढ केली नसती तर सरकारी चारही पेट्रोल कंपन्या डबघाईला निघण्याची शक्यता होती. मात्र, सरकारने एक रक्कमी इतक्या मोठ्याप्रमाणावर दरवाढ करुन जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2012 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close