S M L

'डॉ.सुदाम मुंडेंचं हॉस्पिटल सील करा'

23 मेगर्भपातासाठी बदनाम असलेल्या परळीतल्या मुंडे हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या गैरकारभारामुळे हे हॉस्पिटल सील केलं जावं असा अहवाल परळीच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे. आज बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय महाडीक, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नामदेवराव जाधव यांनी मुंडे हॉस्पिटला भेट दिली. हॉस्पिटलची पाहणी करून त्यांनी अहवाल बनवला आहे. दरम्यान, मुंडे हॉस्पिटलमध्ये गर्भपातावेळी मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेकदा कारवाई करूनही डॉक्टर ऐकत नाहीत. डॉक्टरनं सामाजिक उपद्रव वाढवलेला आहे. त्यामुळे हॉस्पिटलला सील करण्यात यावं असं जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. डॉ मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, डॉ. सुदाम मुंडे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयपीसीच्या 312, 314,315 आणि 316 अंंंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. पोलिसांनी परळीतल्या कोर्टात ही कलमं लावण्यासाठी अर्ज केला होता. परळी कोर्टाने अर्ज स्वीकारला असून या कलमांअतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. या कलमांअंंतर्गत कारवाईचा अधिकार सत्र न्यायालयाला असणार आहे. याआधी पोलिसांनी डॉ. मुंडेविरोधात शुक्रवारी रात्री फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये जामिनपात्र कलमं लावण्यात आली होती. आता याच फिर्यादीत नवी अजामीपात्र कलमं लावण्यात आली आहे. पीसीपीएनडीटी (PCPNDT) आणि एमटीपी (MTP) ऍक्टअंतर्गत ही कारवाई केली जात आहे. तसेच गर्भपाताच्या दरम्यान मृत पावलेल्या महिलेच्या पतीलाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता ही कारवाई केल्यानंतर खरोखरच प्रशासन डॉ मुंडेच्या काळ्या कारनाम्यांना रोखण्यात यशस्वी होतंय का हे पाहाणं महत्त्व ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2012 12:13 PM IST

'डॉ.सुदाम मुंडेंचं हॉस्पिटल सील करा'

23 मे

गर्भपातासाठी बदनाम असलेल्या परळीतल्या मुंडे हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या गैरकारभारामुळे हे हॉस्पिटल सील केलं जावं असा अहवाल परळीच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे. आज बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय महाडीक, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नामदेवराव जाधव यांनी मुंडे हॉस्पिटला भेट दिली. हॉस्पिटलची पाहणी करून त्यांनी अहवाल बनवला आहे. दरम्यान, मुंडे हॉस्पिटलमध्ये गर्भपातावेळी मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेकदा कारवाई करूनही डॉक्टर ऐकत नाहीत. डॉक्टरनं सामाजिक उपद्रव वाढवलेला आहे. त्यामुळे हॉस्पिटलला सील करण्यात यावं असं जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. डॉ मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय.

दरम्यान, डॉ. सुदाम मुंडे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयपीसीच्या 312, 314,315 आणि 316 अंंंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. पोलिसांनी परळीतल्या कोर्टात ही कलमं लावण्यासाठी अर्ज केला होता. परळी कोर्टाने अर्ज स्वीकारला असून या कलमांअतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. या कलमांअंंतर्गत कारवाईचा अधिकार सत्र न्यायालयाला असणार आहे. याआधी पोलिसांनी डॉ. मुंडेविरोधात शुक्रवारी रात्री फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये जामिनपात्र कलमं लावण्यात आली होती. आता याच फिर्यादीत नवी अजामीपात्र कलमं लावण्यात आली आहे. पीसीपीएनडीटी (PCPNDT) आणि एमटीपी (MTP) ऍक्टअंतर्गत ही कारवाई केली जात आहे. तसेच गर्भपाताच्या दरम्यान मृत पावलेल्या महिलेच्या पतीलाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता ही कारवाई केल्यानंतर खरोखरच प्रशासन डॉ मुंडेच्या काळ्या कारनाम्यांना रोखण्यात यशस्वी होतंय का हे पाहाणं महत्त्व ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2012 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close