S M L

नागपुरातल्या सोसायट्यांमध्ये ईलेक्ट्रीसिटी पोलची वानवा

25 नोव्हेंबर, नागपूरकल्पना नळसकरनागपूर शहराचा एकीकडे विकास आणि विस्तार होतोय. पण दुसरीकडे उत्तर नागपूरातल्या सोसायट्यांमध्ये इलेक्ट्रीसिटी पोलच नाहीत. कंपीननं त्यांना मीटर दिलेत पण इलेक्ट्रीसिटी पोलच लावलेले नाहीत. त्यामुळं नागरिकांना जीव धोक्यात घालून यावर मार्ग काढावा लागतोय. नागपूरच्या आदर्श कॉलनीमध्ये कुशाल घरफोडे गेल्या 10 वर्षापासून राहत आहेत. त्यांच्याकडे इलेक्ट्रिक मिटर तर आहे पण या भागात पोलचं नाही. त्यामुळं त्यांनी लाकडी पोलं उभारले. पण यातला धोका लक्षात घेता त्यांना सतर्क रहावं लागतं. "पावसाळ्यात इथून जीव मुठीत घेउन जाव लागत. मुलं खेळतात तेव्हा भीती वाटते. हे पोल कधी पडतील हे सांगता येत नाही." असं कुशाल घरफोडे यांनी सांगितलं.या सगळ्या कॉलनी 1900 ले आऊट अंतर्गत येतात. त्यातल्या 340 कॉलन्यांपैकी फक्त 4 कॉलन्यांमध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल पोलं देण्यात आले आहेत. इथल्या नागरिकांनी डिमान्ड ड्राफ्ट भरुन सुध्दा इलेक्ट्रीसिटी पोलं देण्यात आले नाहीय. त्यामुळे नागरिकांनी तात्पुरती सुविधा म्हणून हे असे लाकडी पोलं उभारले आहेत. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी आता लवकरच इथं पोल लावण्याचं आश्वासन दिलं आहे. पण कोणतीही दुर्घटना घडण्याच्या आत हे पोल लावले जाणं गरजेचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 05:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 05:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close