S M L

'डॉ. मुंडे यांना अटकपूर्व जामीन देऊ नका'

25 मेबीड येथील परळीतल्या डॉ.सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे अजुनही फरार आहेत. मात्र बीड जिल्ह्यातल्या कोणत्याही कोर्टामध्ये ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर होऊ नये यासाठी परळी पोलिसांनी अंबाजोगाई कोर्टामध्ये विशेष अर्ज दाखल केला आहे. तसेच यासोबतच 2010मध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याखाली डॉ. मुंडेंविरोधात एक केस दाखल करण्यात आली होती. असा गुन्हा पुन्हा न करण्याच्या अटीवर त्यांना त्यावेळी जामीन मिळाला होता. पण 18 मे 2012 ला डॉ. मुंडेंनी पुन्हा तोच गुन्हा केलाय. त्यामुळे 2010 च्या खटल्यात दिलेला जामीनही रद्द करण्यात यावा असा अर्ज सरकारी पक्षाने कोर्टात केला आहे.दरम्यान, मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. अतिरक्तस्त्रावामुळे तिचा गर्भपात करावा लागला त्यात तिचा मृत्यू झाला असं डॉक्टर मुंडेंचं म्हणणं होतं. पण मुंडेंचा दावा खोटा असल्याचं पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट होतंय असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2012 09:59 AM IST

'डॉ. मुंडे यांना अटकपूर्व जामीन देऊ नका'

25 मे

बीड येथील परळीतल्या डॉ.सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे अजुनही फरार आहेत. मात्र बीड जिल्ह्यातल्या कोणत्याही कोर्टामध्ये ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर होऊ नये यासाठी परळी पोलिसांनी अंबाजोगाई कोर्टामध्ये विशेष अर्ज दाखल केला आहे.

तसेच यासोबतच 2010मध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याखाली डॉ. मुंडेंविरोधात एक केस दाखल करण्यात आली होती. असा गुन्हा पुन्हा न करण्याच्या अटीवर त्यांना त्यावेळी जामीन मिळाला होता. पण 18 मे 2012 ला डॉ. मुंडेंनी पुन्हा तोच गुन्हा केलाय. त्यामुळे 2010 च्या खटल्यात दिलेला जामीनही रद्द करण्यात यावा असा अर्ज सरकारी पक्षाने कोर्टात केला आहे.

दरम्यान, मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. अतिरक्तस्त्रावामुळे तिचा गर्भपात करावा लागला त्यात तिचा मृत्यू झाला असं डॉक्टर मुंडेंचं म्हणणं होतं. पण मुंडेंचा दावा खोटा असल्याचं पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट होतंय असं पोलिसांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2012 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close