S M L

13/7 बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपपत्र दाखल

25 मेमुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या सीरिअल बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसने आज आरोपपत्र दाखल केलं. 4 हजार 788 पानांचं हे आरोपपत्र आहे. याप्रकरणी एकूण 641 साक्षीदार तपासण्यात आले. तर 19 साक्षीदारांनी सर्व आरोपींना ओळखलंय. मुंबईत दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर तर 127 जण जखमी झाले होते. याप्रकरणी तीन महिन्यानंतर एटीएसने या प्रकरणात नदीम शेख, हारुन नाईक, नकी आणि कुवर नैन या चार जणांना अटक केली होती. यानंतर आणखी एका आरोपीला अटक झाली. मोहम्मद कफिल अन्सारी असं त्याचं नाव आहे. तो मूळचा बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातला आहे. कटात भाग घेणं, मदत करणं असे त्याच्यावर आरोप आहेत. या आरोपींविरोधात विशेष मोक्का कोर्टात आरोप पत्र दाखल करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2012 10:13 AM IST

13/7 बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपपत्र दाखल

25 मे

मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या सीरिअल बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसने आज आरोपपत्र दाखल केलं. 4 हजार 788 पानांचं हे आरोपपत्र आहे. याप्रकरणी एकूण 641 साक्षीदार तपासण्यात आले. तर 19 साक्षीदारांनी सर्व आरोपींना ओळखलंय. मुंबईत दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर तर 127 जण जखमी झाले होते. याप्रकरणी तीन महिन्यानंतर एटीएसने या प्रकरणात नदीम शेख, हारुन नाईक, नकी आणि कुवर नैन या चार जणांना अटक केली होती. यानंतर आणखी एका आरोपीला अटक झाली. मोहम्मद कफिल अन्सारी असं त्याचं नाव आहे. तो मूळचा बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातला आहे. कटात भाग घेणं, मदत करणं असे त्याच्यावर आरोप आहेत. या आरोपींविरोधात विशेष मोक्का कोर्टात आरोप पत्र दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close