S M L

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

26 मेबार्शी येथे हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्यानं सोनाली प्रदीप शिंदे या विवाहीतेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनालीच्या वडीलांनी तक्रार दाखल केल्यानंतर तीचा नवरा प्रदीपसह सासरच्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चौघांना कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना केली आहेत. सोनालीचा पती प्रदीप हा बंगलोरला एका खाजगी शाळेत शिक्षक आहे. बंगलोरला राहण्याचा खर्च परवडत नसल्यानं माहेरून 1 लाख रुपये आणण्यासाठी सोनालीला प्रदीपसह त्याच्या आई-वडील आणि बहिणीनं वारंवार जबरदस्ती करुन छळ केला होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून सोनालीनं विष पिऊन आत्महत्या केल्याची तक्रार सोनालीच्या वडीलांनी दाखल केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2012 10:06 AM IST

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

26 मे

बार्शी येथे हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्यानं सोनाली प्रदीप शिंदे या विवाहीतेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनालीच्या वडीलांनी तक्रार दाखल केल्यानंतर तीचा नवरा प्रदीपसह सासरच्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चौघांना कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना केली आहेत. सोनालीचा पती प्रदीप हा बंगलोरला एका खाजगी शाळेत शिक्षक आहे. बंगलोरला राहण्याचा खर्च परवडत नसल्यानं माहेरून 1 लाख रुपये आणण्यासाठी सोनालीला प्रदीपसह त्याच्या आई-वडील आणि बहिणीनं वारंवार जबरदस्ती करुन छळ केला होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून सोनालीनं विष पिऊन आत्महत्या केल्याची तक्रार सोनालीच्या वडीलांनी दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2012 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close