S M L

दरवाढीविरोधात राष्ट्रवादीही रस्त्यावर

25 मेपेट्रोल दरवाढीचा निषेध आजही सुरूच आहे. आज पुण्यात यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. शहरातील अलका टॉकीज परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पेट्रोल दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पुण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीमध्येही पेट्रोल दरवाढीचा निषेध करत आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि काँग्रेसविरोधात घोषणाही दिल्या. दरवाढीविरोधात आरपीआयचं आंदोलनतर मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केलं. आरे रोड गेट नंबर 5 वर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम झाली होतं. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला निषेध व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2012 11:19 AM IST

दरवाढीविरोधात राष्ट्रवादीही रस्त्यावर

25 मे

पेट्रोल दरवाढीचा निषेध आजही सुरूच आहे. आज पुण्यात यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. शहरातील अलका टॉकीज परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पेट्रोल दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पुण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीमध्येही पेट्रोल दरवाढीचा निषेध करत आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि काँग्रेसविरोधात घोषणाही दिल्या.

दरवाढीविरोधात आरपीआयचं आंदोलन

तर मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केलं. आरे रोड गेट नंबर 5 वर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम झाली होतं. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला निषेध व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2012 11:19 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close